उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेटर सुरु केल्याने सर्व सामान्य रुग्णांना मिळेना आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:12 AM2021-04-11T04:12:02+5:302021-04-11T04:12:02+5:30

भोर शहरातील रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिड हेल्थ केअर सेंटर सुरु असून गेल्या अनेक महिन्यापांसून येथील बाह्य रुग्ण विभाग ...

With the introduction of Kovid Setter in the sub-district hospital, not all the general patients get health | उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेटर सुरु केल्याने सर्व सामान्य रुग्णांना मिळेना आरोग्य

उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेटर सुरु केल्याने सर्व सामान्य रुग्णांना मिळेना आरोग्य

Next

भोर शहरातील रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिड हेल्थ केअर सेंटर सुरु असून गेल्या अनेक महिन्यापांसून येथील बाह्य रुग्ण विभाग बंद आहे. उपजिल्हा रुग्णालयात वर्षापूर्वी दरमहा ४५ ते ५० गर्भवती महिलांची प्रसुती व सिझर शस्ञक्रिया केली जात होती, सध्या त्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत. त्यामुळे महिलांना खासगी रुग्णालयात जावे लागत असून तेथे अव्वाच्या सव्वा बील उकळले जात आहे. त्यामुळे इतर सरकारी रुग्णालयात मोफत प्रसुतीची सोय करावी अशी मागणी हचोत आहे. गर्भवती महिलांची उप जिल्हा रुग्णालयात होणारी नियमित तपासणी बंद झाली असून महिलांची सोनोग्राफीही होत नसल्याने तालुक्यातील गर्भवती महिलांचे रुग्ण सेवे अभावी मोठे हाल होत आहे.

पूर्वी सर्पदंश आणि श्वानदंशावर येथे नियमीत लस उपलब्ध असायची. त्यामुळे रुग्णांना कोठेच धावपळ करावी लागत नसे मात्र यो दोन लससुध्दा रुग्णांना देण्यात येत नाही त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. साधे टीटीचे इंजेक्शन घेण्यासाठीही रुग्णांना खासगी दवाखान्यात १०० रुपये द्यावे लागत आहेत.

खाजगी दवाखान्यांची फी गरीब रुग्णांना न परवडणारी असल्याने रुग्णांची अक्षरश: पिळवणूक होत आहे. ओपीडी साठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्ण सेवे अभावी रुग्णांची हेळसांड होत असून पर्यायी सेवाही योग्य वेळी मिळत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागत आहे. रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींसाठीचे होणारे शिबिर होत नसल्याने त्यांना दाखलेही मिळेनासे झाले आहेत. त्याचप्रमाणे मधुमेहाचे व रक्तदाबाचे रुग्णांना औषधे मिळत नसल्याने प्रसंगी त्यांचे औषधा अभावी हाल होत आहेत.

--

चौकट

विविध प्रमाणपत्र मिळणे झाले बंद

--

रुग्णालयात होणारी विवाह नोंदणी बंद असल्याने विवाह प्रमाणपत्र मिळवताना लोकांना नाहक धावपळ करावी लागत आहे. हे सारे उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिड सेंटर सुरु केल्या मुळे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. त्यामुळे रुग्णालयामध्ये कोवडी सेंटरचे एक स्वतंत्र कक्ष सुरु करावे व त्यासाठी प्रवेशाचा मार्ग वेगळा करावा व प्रशासन, डॅाक्टरही स्वतंत्र नेमावे आणि इतर रुग्णांसांठी वेगळी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

-

कोट १

आम्ही शासनाच्या आदेश व नियमांप्रमाणे काम करत आहोत. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच कमतरता असतानाही करोना बाधित रुग्णांना सेवा देत आहोत. यामुळे लोकही रुग्णालयात उपचारासाठी येण्यास घाबरत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र जे रुग्ण येतात त्यांना आरोग्य विषयक सल्ला देत आहोत.

- डॉ. दत्तात्रय बामणे,

अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय

Web Title: With the introduction of Kovid Setter in the sub-district hospital, not all the general patients get health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.