शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चाकू दाखवून घाबरविणे पडले महागात; तोच चाकू खुपसून केला खून, कोंढव्यातील घटना

By विवेक भुसे | Updated: April 26, 2023 15:52 IST

रस्त्यावरून पायी जाताना आरोपीने शिवीगाळ करून वाद निर्माण केला

पुणे : एकमेकांकडे पाहण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्याने दुसऱ्याला घाबरविण्यासाठी चाकू दाखविला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन चाकूने वार केले. तोच चाकू हिसकावून घेऊन त्याने त्याच्या पोटात खूपसला. त्यात त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अहमद रजा खान (वय २१, रा. युनिटी पार्क, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सलमान फारुख खान (वय २३, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सलिम इब्राहिम खान (वय ४९, रा. नवाजिश चौक, कोंढवा) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत सलिमही जखमी झाला असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही घटना कोंढव्यातील गरीब नवाज हॉस्पिटलसमोरील रोडवर मंगळवारी सकाळी ९ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ अहमद खान हा मंगळवारी गरीब नवाज हॉस्पिटल येथून पायी जात होता. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा सलिम खान याने अहमद याच्याकडे पाहून शिवीगाळ केली. त्याबाबत त्याने विचारणा केली असता त्यांच्यात वाद झाला. तेव्हा अहमद याने सलीम खान याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन चाकूने पोटावर व हातावर वार केले. जखमी झालेल्या सलिम याने त्याच्याकडील चाकू हिसकावून घेत त्याच चाकूने अहमद याच्या पोटात सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या अहमद याचा मृत्यु झाला. या घटनेत सलिमही जखमी झाला. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. सलिम खान याच्या फिर्यादीवरुन मृत्यु पावलेल्या अहमद खान याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर एस मोहिते तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकDeathमृत्यू