शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अबब! एक ना दोन तब्बल ७०० सीसीटीव्ही तपासणीतून आंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 00:07 IST

कर्नाटकातून तिघांना अटक ; रविवार पेठ, कोथरुडमधील गुन्हे उघडकीस

पुणे : रविवार पेठेत सोनेचांदीच्या व्यापार्याच्या गाडीच्या बॉनेटवर ऑईल सांडल्याचा बनाव करुन त्याच्या गाडीतील ५५ लाख रुपयांचे दागिने चोरणार्यांचा माग काढण्यासाठी फरासखाना पोलिसांनी तब्बल ७०० सीसीटीव्हीचा माग काढला. त्यावरुन थेट कर्नाटकात जाऊन तिघांच्या मुसक्या आवळल्या.

शंकर लक्ष्मण आचारी उर्फ शेट्टी (वय ३५, रा. ता. भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक), यादगीर लक्ष्मण आचारी, मेरी व्यंकटेश नायडु अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार व मुख्य सुत्रधार व्यंकटेश नायडु, शांता लक्ष्मण आचारी, लक्ष्मण आचारी, यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांनी अशाच प्रकारे कोथरुडमध्येही ७ लाख रुपयांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

करण माळी (वय ३५, रा. देहुरोड) या सोनेचांदी व्यापार्याने रविवार पेठेतून दागिने खरेदी करुन ते ३१ डिसेंबरला घरी जात होते. त्यावेळी आर सी एम कॉलेजसमोर त्यांच्या गाडीवर ऑईल टाकले. माळी यांना गाडीतून ऑईल सांडत असल्याचा बनाव केला. त्यांना बाहेर बोलावून बोनेट उघडले. त्या दरम्यान, दुसऱ्याने त्यांच्या गाडीतील ५५ लाख ६२ हजार रुपयांचे दागिने असलेली बॅग चोरुन नेली होती. यातील तिघा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी फरासखाना पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असताना पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण व आकाश वाल्मीकी यांना एका दुचाकीवरुन संशयित जाताना दिसला. त्या तिघांचा घटनास्थळापासून थेट सासवडपर्यंत सुमारे ७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे माग करण्यात आला. त्याच्यातील एक जण तेथे बांधकाम सुरु असलेल्या घरातून येताना दिसला. तेथील कामगारांकडे तपास केल्यावर त्याने एकाने फोन करण्यासाठी आपल्याकडून मोबाईल घेतल्याचे सांगितले. त्याच्याकडून तो मोबाईल नंबर मिळविला. पोलीस उपायुक्त कार्यालयातील अंमलदार शरद वाकसे याच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करुन तो मोबाईल नंबर शंकर आचारी याचा असल्याचा व तो कर्नाटकमधील असल्याचे निष्पन्न झाले. या धाग्यावरुन पोलिसांनी कर्नाटकात जाऊन शंकर आचारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदार श्रीनिवास लक्ष्मण आचारी, यादगीर आचारी, हरीष शेट्टी यांनी मिळून सोनेचांदीची बॅग चोरल्याचे सांगितले. ही बॅग मेरी, व्यंकटेश नायडु यांनी कर्नाटकात नेल्याचे सांगितले. त्यावरुन लक्ष्मण आचारी व मेरी नायडु यांना अटक करण्यात आली आहे.

कर्नाटक राज्यातील टोळीने महाराष्ट्र व इतर राज्यात जाऊन लहान मुलांच्या सहाय्याने गाडीवर ऑईल टाकून, अंगावर घाण टाकून, खाज खुजली टाकून नागरिकांची दिशाभूल करतात. त्यांची नजर चुकवून दुचाकी, चार चाकीमधील बॅगा लंपास करतात. तसेच गर्दीचा फायदा घेऊन सोने व पैसे चोरी करतात. हे चोरटे विविध शहरात जाऊन तेथे काही दिवस भाड्याने घर घेऊन चोरी करुन नंतर दुसरीकडे जात असतात.

अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे, राजेश तटकरे, तसेच सहायक निरीक्षक अभिजित पाटील, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, अमोल सरडे, मोहन दळवी, सुदेश सपकाळ, सचिन सरपाले, आकाश वाल्मीकी, राकेश क्षीरसागर, मयुर भोकरे, अभिनय चौधरी, ऋषीकेश दिघे, महंमद हनीफ शौकत शेख, तुषार खडके, पंकज देशमुख, समीर पवार, शरद वाकसे, महावीर वलटे, निशा कुंभार, सुनिता आंधळे यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकtheftचोरीThiefचोरcctvसीसीटीव्ही