शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

International Women’s Day 2023| पोल डान्सकडे बघण्याचा ‘दृष्टिकोन’ बदलावा- नूपुर चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 15:10 IST

या साहसी प्रकाराला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यास मान्यता मिळण्यासाठी इंटरनॅशनल पोल फेडरेशनचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले...

पुणे : पोल डान्स म्हणजे एखाद्या हिंदी चित्रपटांमध्ये आयटम साँग किंवा डान्स बारमध्ये अत्यंत तोकड्या कपड्यांमध्ये डान्स करणाऱ्या तरुणी अशीच काहीशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. मात्र, इतकंच पोलबद्दलचे आपले अल्प ज्ञान. पोल डान्सकडे कलेबरोबरच स्पोर्ट, फिटनेस आणि थेरपी म्हणून बघण्याचा दृष्टिकोन दिला आहे, तो पुण्यातील पोल आर्टिस्ट नूपुर चौधरी यांनी. या साहसी प्रकाराला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यास मान्यता मिळण्यासाठी इंटरनॅशनल पोल फेडरेशनचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनानिमित्त नूपुर चौधरी यांची कहाणी इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. नूपुर यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी पोल डान्स शिकण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आई आणि पतीने पाठिंबा दिला; पण विरोध केला तो वडिलांनी. हे काय आता शिकायची गरज आहे का? असं त्यांचं म्हणणं होतं. मित्रमंडळींनीही कुत्सितपणे मग आता तू स्टिपर होणार का? असे टोमणे मारले. सुरुवातीला नूपुर जेव्हा व्हिडीओ तयार करून कुटुंबातील सर्वांना दाखवायच्या, तेव्हा त्यांचे वडील कधीच ते व्हिडीओ पाहात नसतं. पण, जेव्हा नूपुर यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविलेले पाहिले आणि त्यांचा विरोध मावळला. पोल डान्सपासून पोल फिटनेसकडे सर्वसामान्यांचा दृष्टिकोन बदलण्याचा त्यांचा प्रवास म्हणावा तितका सुखकर नव्हता. हा प्रवास नूपुर चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना कथन केला.

त्या म्हणाल्या, पुण्यात पोल डान्सचे प्रशिक्षण देणारे कुणी नव्हते. मी तेव्हा आठवड्यातून एकदा मुंबईला केवळ पोल डान्सचे प्रशिक्षण घ्यायला जायचे. दरम्यान, पोल डान्स शिकत असतानाच मला दुखापत झाली. हाताचं हाड सरकल्याने काहीच करता येणं शक्य नव्हतं. फिजिओथेरपिस्ट यांनी आता तुम्ही पोल डान्स करू शकणार नसल्याचे सांगितले. मी नैराश्यात गेले. मात्र, दुसऱ्या एका डॉक्टरांनी मला आत्मविश्वास दिल्याने बरी होऊन मी पुन्हा पोल डान्स करायला लागले. दुबई येथे जाऊन मी पोल डान्सचे अधिकृत प्रशिक्षण घेतले. आंतरराष्ट्रीय पोल स्पर्धेत ऑनलाइन सहभागी होत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि रौप्यपदक पटकावले. इंडिया गॉट टॅलेन्टमध्येही मी भाग घेतला आणि परीक्षकांनी माझे खूप कौतुक केले.

पोल डान्समध्ये मन आणि देहाचे कॉर्डिनेशन खूप आवश्यक आहे. सोशल मीडियावरील माझ्या फोटो आणि व्हिडिओवर लोकं कौतुक करताना दिसत आहेत. हेच यश असल्याचे मी मानते.

- नूपुर चौधरी, पोल आर्टिस्ट

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र