शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बांबूंच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे : राज्यपाल सी. विद्यासागर राव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 19:15 IST

बांबूच्या वस्तूंच्या विक्रीची क्षमता प्रचंड आहे. स्वयंपाकघरात वापरावयाच्या वस्तू, घरांसाठी उपयोग असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे बांबूचे उपयोग आहेत.

ठळक मुद्देबांबू हस्तकला केंद्राचे उद्घाटन बांबू हस्तकला व कला केंद्रांच्या माध्यमातून बांबूविषयक संशोधन व्हावेनाविन्यपूर्ण कल्पना लढवल्या तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी उलाढाल करणे शक्यराज्यात त्याचे क्षेत्र ४ हजार ४६२ स्क्वेअर किमी इतके वाढले

पुणे : राज्यातील सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ येथे स्थापन केलेल्या बांबू हस्तकला व कला केंद्रांच्या माध्यमातून बांबूविषयक संशोधन व्हावे. इथे तयार होणाऱ्या बांबूच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह संत गाडगेबाबा व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील बांबू हस्तकला व कला केंद्राचे सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यावेळी उपस्थित होते.सी. विद्यासागर राव म्हणाले, बांबूच्या वस्तूंच्या विक्रीची क्षमता प्रचंड आहे. स्वयंपाकघरात वापरावयाच्या वस्तू, घरांसाठी उपयोग असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे बांबूचे उपयोग आहेत. यामध्ये विद्यापीठांनी संशोधन केले आणि नाविन्यपूर्ण कल्पना लढवल्या तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी उलाढाल करणे शक्य आहे. ई-कॉमर्स साईट्सच्या माध्यमातूनही त्यांची विक्री व्हावी. अशा प्रकारे बांबू संशोधन केंद्रे ही ग्रामीण आणि आदिवासी व्यक्तींच्या विकासाची केंद्रे बनावीत. सध्या घरात फर्निचर करावयाचे असल्यास लोकांचा चीनकडे जाण्याचा ओढा असतो, मात्र बांबूच्या वस्तूंचा चांगला उपयोग करून घेतल्यास चिनी व्यावसायिकांना या वस्तूंसाठी महाराष्ट्रात यावे लागावे अशी परिस्थिती निर्माण करायला हवी.सुधीर मुनगंठीवार म्हणाले, बांबू ही कल्पवृक्ष असलेली प्रजाती आहे. जन्मापासून मरणापर्यंत माणसाला बांबूची उपयोगी पडतो. राज्य शासनाने प्रयत्नपूर्वक बांबू लागवडीवर भर दिल्यामुळे राज्यात त्याचे क्षेत्र ४ हजार ४६२ स्क्वेअर किमी इतके वाढले आहे. बांबू मधून मोठयाप्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतील.’’विकास खारगे यांनी सांगितले, पूर्वी बांबू हे लाकूड म्हणून गणले जात होते, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र राज्य शासनाच्या प्रयत्नांनंतर बांबूचा समावेश आता गवत म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे मोठयाप्रमाणात बांबू लागवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. .............प्राविण्य मिळविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखावासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून माझ्या अनेक अपेक्षा आहेत. विद्यापीठाच्या सर्वच विभागांनी प्राविण्य (एक्सलन्स) मिळवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केली.डॉ. करमळकर यांनी प्रास्ताविक केले, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी