आंतरमहाविद्यालयीन सिम्बायोसिस करंडक होणार ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:39 IST2020-11-22T09:39:12+5:302020-11-22T09:39:12+5:30
\Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नाटकात वाचिक अभिनयाचे व्यासपीठ मिळवून देणारा आंतरमहाविद्यालयीन सिम्बायोसिस करंडक यंदा ऑनलाइन होणार आहे. ...

आंतरमहाविद्यालयीन सिम्बायोसिस करंडक होणार ऑनलाइन
\Sलोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नाटकात वाचिक अभिनयाचे व्यासपीठ मिळवून देणारा आंतरमहाविद्यालयीन सिम्बायोसिस करंडक यंदा ऑनलाइन होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये अजूनही सुरू झाली नाहीत. नाट्यस्पर्धा आयोजित करणारे संयोजक महाविद्यालये सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
सिम्बायोसिस महाविद्यालय गेल्या ३५ वर्षांपासून आंतरमहाविद्यालयीन सिम्बायोसिस करंडक ही नाट्य वाचन स्पर्धा घेत आहे. दरवर्षी ३५ ते ४० संघ स्पर्धेत सहभागी होतात. एका संघात कमीत कमी दोन तर जास्तीत जास्त सात विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
यंदा स्पर्धेची एकच फेरी होणार आहे. संघांना कोणत्याही जागेत एकत्र येऊन अभिवाचनाचा वीस मिनिटांचा व्हिडिओ तयार करावा लागेल. हा व्हिडिओ संयोजकांकडे पाठवायचा आहे. दोन आणि तीन डिसेंबर या दोन दिवसात परीक्षक व्हिडिओचे परीक्षण करतील. त्यानंतर चार बक्षीसे काढण्यात येतील.
चौकट
“यंदा जुलै महिन्यापासून ऑनलाईन स्पर्धेची तयारी सुरू केली. स्पर्धेचे फॉर्म, एन्ट्री फी, हे सर्व ऑनलाईन होईल. सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर स्पर्धेची नियमावलीही देण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या तयारीसाठी एक महिना वेळ देण्यात आला आहे.
मिहीर अमृतकर, संयोजक, सिम्बायोसिस करंडक