शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अांतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या संसाराला मिळताेय शासनाचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 17:49 IST

अांतरजातीय विवाहांना प्राेत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून अांतरजातीय विवाह करणाऱ्या जाेडप्यांना अर्थसहाय्य देण्यात येते. या याेजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत अाहे.

पुणे : अाज ही आपल्या समाजातून जात काहीकेल्या जात नाही. जातीयवादाची अनेक उदाहरणे गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळाली. परंतु एक गाेष्ट या जातीयवादाला अपवाद ठरत अाहे अाणि ते म्हणजे प्रेमविवाह. अनेक जाेडपी जातीयतेच्या पलीकडे जात अांतरजातीय विवाह करतात. अनेकदा प्रतिगामी विचारांची कुंटुंब अश्या जाेडप्यांना स्वीकारत नाही. अशावेळी या नवजाेडप्यांच्या संसाराला हातभार लावण्याचं काम सरकारकडून करण्यात येत अाहे. सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या अांतरजातीय विवाहास प्राेत्साहनपर अर्थसहाय्य याेजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून 2017- 18 या वर्षात पुणे जिल्ह्यातील 295 अांतरजातीय विवाह केलेल्या जाेडप्यांना या याेजनेचा लाभ मिळाला अाहे. 

    सामाजिक विषमता दूर हाेऊन समाजामध्ये समतेची भावना रुजावी, त्यांच्यात एकात्मता दृढ व्हावी, समाज एकसंघ व्हावा, जातीपातीचे समुळ निर्मूलन व्हावे यासाठी राज्य सरकारकडून अांतरजातीय विवाहास प्राेत्साहनपर अर्थसहाय्य याेजना राबविण्यात येत अाहे. या याेजनेंतर्गत समजकल्याण विभागाकडे अर्ज करणाऱ्या जाेडप्यांना 50 हजार रुपये दिले जातात. नवीन जाेडप्याला अापला संसार सुरु करता यावा यासाठी ही मदत सरकारकडून करण्यात येते. त्याचबराेबर जास्तीत जास्त अांतरजातीय विवाह वाढून समाजातील जातीयता नष्ट व्हावी हे शासनाचे या याेजनेमागील उद्दीष्ट अाहे. या याेजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे. 2016-17 या वर्षांत 225 जाेडप्यांना या याेजनेचा लाभ मिळाला हाेता तर 2017-18 या वर्षात 295 जाेडप्यांना अार्थिक मदत करण्यात अाली अाहे. 

    याबाबत बाेलताना पुणे जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी प्रविण काेरगंटीवार म्हणाले, या याेजनेमुळे अनेक जाेडप्यांचा संसार सुरु हाेण्यास हातभार मिळाला अाहे. अनेकदा अांतरजातीय विवाह करणाऱ्या जाेडप्यांना घरच्यांकडून मदत मिळत नाही. जी जाेडपी कमी उत्पन्न गटातील अाहेत त्यांना लग्नानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागताे. त्यांना या याेजनेचा माेठा फायदा हाेत अाहे. लाेक स्वतःहून अामच्याकडे या याेजनेची माहिती विचारण्यासाठी येत अाहेत. अामच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीद्वारे अाम्ही जास्तीत जास्त जाेडप्यांना या याेजनेचा लाभ देत अाहाेत. समाज कल्याण विभागाची सर्वात यशस्वी अशी ही याेजना अाहे. समाजाने या याेजनेकडे चांगल्या दृष्टीने पाहायला हवे. या याेजनेच्या अटी1) लग्न हे 1 फेब्रुवारी 2010 नंतर झालेले असावे.2) वराचे वय 21 वर्षे पूर्ण व वधुचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.3) वर व वधू दाेघेही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. 4) वर व वधू यापैकी एकजण हिंदू सवर्ण व दुसरी व्यकी हिंदू मागासवर्गीय प्रवर्गातील (एस.सी, एस.टी, व्ही.जे.एन.टी, एस.बी.सी ) असावी5) ज्या ठिकाणी या याेजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज केला असेल त्या जिल्ह्याचा वर हा रहिवासी असावा.6) वर व वधू दाेघांच्या नावाने संयुक्त खाते असावे

या याेजनेसाठी अावश्यक कागदपत्रे1) विवाह नाेंदणी दाखला2) वर व वधू यांचा शाळा साेडल्याचा दाखला3) वर व वधू यांचा महाराष्ट्राचे रहिवासी असलेचा तहसिलदार किंवा जिल्हाधिकारी यांचा रहिवासी दाखला4) वर व वधू यापैकी जे मागासवर्गीय असतील त्यांचा जातीचा दाखला5) दाेन प्रतिष्ठित व्यक्तिंची प्रत्येकी दाेन शिफारस पत्रे6) संयुक्त खात्याच्या पासबुकची झेराॅक्स प्रत7) वधुवराचा एकत्र फाेटाे

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नGovernmentसरकारfundsनिधी