शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

संयुक्त एकात्मिकप्रणाली सामना करू शकेल - डॉ. जसवंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 03:05 IST

डॉ. जसवंत पाटील । सर्व शाखांनी कोरोनाबाबत परस्परपूरक कार्य करावे

प्रज्ञा केळकर-सिंंग ।पुणे : कोणतेही शास्त्र श्रेष्ठ किंंवा कनिष्ठ नसते. प्रत्येक डॉक्टर रुग्णसेवेचे व्रत घेऊनच कार्यरत असतो. सध्या कोरोनामुळे जगात लाखो लोक जीव गमावत आहेत. या साथीवर मात करायची असेल, तर अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी किंंवा आयुर्वेद असा भेदभाव न करता सर्व शाखांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे मत ज्येष्ठ वैद्यकीयतज्ज्ञ डॉ. जसवंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. याबाबत प्रतिभाताई पाटील यांच्याशी बोलणे झाले असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. पाटील म्हणाले, की सध्या कोरोनावर आपल्याकडे काहीच औषध उपलब्ध नाही. होमिओपॅथी, आयुर्वेदमधील औषधांनी, उपचारांना प्रायोगिक तत्त्वावर मान्यता दिल्यास झाला तर फायदाच होईल, नुकसान काहीच होणार नाही. सर्व प्रकारच्या शास्त्रांची विशिष्ट पद्धत असते. त्यातून कोणतेच शास्त्र परिणामकारक किंंवा अपरिणामकारक असे ठरवता येत नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाखांनी परस्परपूरक काम करून या संकटाचा सामना केला पाहिजे.संयुक्त एकात्मिक प्रणालीवर माझा विश्वास आहे. विविध वैद्यकीय शाखा एकत्र येतात, तेव्हा त्या एकमेकांच्या उणिवा भरून काढू शकतात. माझेच शास्त्र चांगले असा अट्टहास न करता सर्वांनी एकमेकांना पूरक असे काम केले पाहिजे. मी काही वर्षांपूर्वी शासनाकडे संयुक्त एकात्मिक प्रणालीचा अहवालही सोपवला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीचा विचार केल्यास हे संकट मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.जिथे अ‍ॅलोपॅथी थांबे, तिथे होमिओपॅथी लागू पडतेमी मूळचा अ‍ॅलोपॅथीचा डॉक्टर. अनेक वर्षे केईएम हॉस्पिटलमध्ये कार्यरत होतो. जळगावमध्ये स्वत:चे क्लिनिकही आहे. १९९५-९६ च्यादरम्यान माझ्या आईची तब्येत खूप बिघडली. मल्टिआॅर्गन फेल्युअर झाले होते. सर्व डॉक्टर मित्रांशी चर्चा केली, अनेक उपचार केले. मात्र, काहीच उपयोग होत नव्हता. माझ्यासह अनेक डॉक्टर हतबल, हताश झाले होते. त्यावेळी शेवटचा उपाय म्हणून होमिओपॅथीचे औषध देण्याचे ठरले. याचा काही उपयोग होणार नाही, अशीच माझी धारणा होती. मात्र, हा उपाय रामबाण ठरला. आईची तब्येत ७२ तासांत पूर्ण स्थिर झाली. मी खूप प्रभावित झालो. जिथे अ‍ॅलोपॅथी काम करीत नाही, तिथे होमिओपॅथी लागू पडते, यावर विश्वास बसला. त्यावेळी मी बीएचएमएसची पदवी प्राप्त केली. माझ्या दवाखान्यातील रुग्णांना अ‍ॅलोपॅथी अधिक होमिओपॅथी असे उपचार देऊ लागलो. रुग्णांच्या अनेक तक्रारी कमी झाल्या, त्यांच्यातील आजाराचे प्रमाण कमी झाले, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले.

टॅग्स :PuneपुणेTeam Indiaभारतीय क्रिकेट संघcorona virusकोरोना वायरस बातम्या