शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

विमा कंपनी कोट्यधीश; दहा जणांसाठी मोजले ५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 2:21 AM

दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा; जनजागृतीचा अभाव; ६ लाख ८४ हजार करदात्यांसाठी भरले होते पैसे

पुणे : महापालिकेने मिळकतकरदात्या नागरिकांसाठी सुरू केलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेचा लाभ गेल्या एक वर्षात अवघ्या दहाच कुटुंबांना मिळाला आहे. पालिकेने सहा लाख ८४ हजार नागरिकांचा अपघात विमा उतरविला होता. त्यापोटी विमा कंपनीला पाच कोटी रुपयांचा प्रीमियम भरण्यात आला. मात्र, आरोग्य विभागाच्या जनजागृतीअभावी या योजनेची माहितीच बहुतांश नागरिकांना झालेली नाही. आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्यासह त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विमा कंपनीचे फावले आहे. मिळकत कर भरणाऱ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसदाराला विम्यापोटी पाच लाख रुपये मिळत होते. या योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. निवासी मिळकतकर धारकाच्या कुटुंबात तो स्वत:, त्याची पत्नी किंवा पती, त्याच्यावर अवलंबून असलेली २३ वर्षांखालील पहिली दोन अविवाहित अपत्ये, मिळकतकर दात्याचे आई व वडील अशांना विम्याची रक्कम देण्याची तरतूद आहे. पालिकेच्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद करण्यात आली होती.मिळकतकर धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये, तसेच मिळकतकर धारकाच्या पत्नीचा किंवा पतीचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये, मिळकतकर धारकावर अवलंबून असलेल्या २३ वर्षांखालील पहिल्या दोन पाल्यास अपघाती मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबाला मूळ विमा रकमेच्या ५० टक्के म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये, मिळकत धारकाच्या आई किंवा वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख पन्नास हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.२८ फेब्रुवारी २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीसमवेत करार करण्यात आला. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या वर्षाचा निवासी मिळकत कर व गवनी शुल्क भरणाºया करदात्यांना ही योजना लागू करण्यात आली. २८ फेब्रुवारी ते आजअखेर अपघाती मृत्यू, अपघातात पूर्ण अथवा अंशत: अंपगत्व इत्यादी कारणांसाठी योजनेंतर्ग दहा कुटुंबांना लाभ मिळाला आहे. तर उर्वरीत सहा प्रस्तावांची कार्यवाही सुरू आहे. मात्र, लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढविण्यासाठी पालिकेने जनजागृती करण्याची आणि प्रत्येक मिळकतकरदात्यापर्यंत ही माहिती पोचविण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.अंदाजपत्रकामध्ये विमा लाभाची रक्कम पाचवरून सात लाखमहापालिकेचे या वर्षीचे (२०१९-२०) चे अंदाजपत्रक स्थायी समितीने फेब्रुवारी महिन्यात मुख्य सभेसमोर सादर केले. तब्बल ६ हजार ७८५ कोटींच्या या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये विमा लाभाची रक्कम पाचवरून सात लाख करण्यात आली.जवळपास एक महिना होत आला तरी अद्याप आरोग्य विभागाने करदात्या पुणेकरांचा विमा उतरवलेलाच नाही. गेल्या वर्षीच्या विम्याची मुदत २८ फेब्रुवारी रोजीच संपली आहे.त्यामुळे १ मार्चपासून नवीन विमा उतरवेपर्यंतच्या काळामध्ये अपघाती मृत्यू झालेल्या करदात्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभच मिळणार नाही. याकडेही आरोग्य विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका