शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पुणे शहरात उद्या 'नो हॉर्न प्लिज' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार  

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: December 11, 2020 13:05 IST

पुणे शहरात दिवसभरात अंदाजे १ कोटी वेळा हॉर्न वाजवला जातो. त्यातील ९० टक्के हॉर्न हा विनाकारण वाजवला जातो.

पुणे : पुणे शहराचा आवाका दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याच प्रमाणात शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनांचे संख्या वेगाने वाढत चालली आहे.  मात्र याचा परिणाम पर्यावरणावर होत असून वाढत्या प्रदूषणामुळे पुणेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जवळपास एक दिवसात पुण्यामध्ये अंदाजे १ कोटी वेळा हॉर्न वाजवला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षात शहरातील ध्वनिप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. याच धर्तीवर पुण्यात काही सामाजिक संस्था व पुणे पोलिसांच्या पुढाकाराने १२ डिसेंबरला 'नो हॉर्न' अशी मोहीम राबवण्यात येणार आहे.

पुण्यातील लाईफ सेव्हिंग फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस वाहतूक विभागाकडून शहरात १२ डिसेंबर रोजी पूर्ण दिवस हॉर्न न वाजवण्याचा एक अभिनव उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या उपक्रमादरम्यान शनिवारी दुपारी वाजता टिळक चौकात प्रबोधनपर कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, क्रीडा समालोचक सुनंदन लेले आदी उपस्थित राहणार आहेत.

पुण्यात विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्याचाच दुष्परिणाम आपल्याला नागरिकांच्या आरोग्यव्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आहे. पुणेकरांमध्ये ब्लड प्रेशर, हदयरोग, ताणतणाव, चिडखोरपणा, नैराश्य आणि ऐकण्याच्या समस्या वाढल्या आहेत. याच अनुषंगाने भविष्यातील ध्वनिप्रदूषणामुळे निर्माण होणारे धोके टाळण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी हॉर्नच्या योग्य वापरासंबंधी सूचना देणारे फलक लावलेले आढळतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आपण विनाकारण हॉर्न वाजवत ध्वनिप्रदूषणात वाढ करतो. हे टाळण्यासाठी 'नो हॉर्न' संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे, अशी माहिती नवचैतन्य हास्ययोग परिवारचे मकरंद टिल्लू यांनी दिली आहे. 

तसेच या उपक्रमाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री अमृता सुभाष, मुक्ता बर्वे, अभिनेता अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ चांदेकर, कवी संदीप खरे यांनी उपक्रमाचे कौतुक करताना आपला पाठिंबा दर्शविला आहे. 

........... 

पुणे शहरात दिवसभरात अंदाजे १ कोटी वेळा हॉर्न वाजवला जातो. त्यातील ९० टक्के हॉर्न हा विनाकारण वाजवला जातो. १० टक्केच हॉर्न हा निमित्त मात्र वाजतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात पुण्यातील ध्वनिप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये हॉर्नमुळे होत असलेले ध्वनिप्रदूषण व शारीरिक समस्यांविषयी जनजागृती व्हावी. तसेच त्यांनी कमीतकमी हॉर्नचा वापर करावा म्हणून हा उपक्रम आम्ही दरवर्षी १२ डिसेंबरला आयोजित करत असतो. देवेंद्र पाठक,  लाईफ सेव्हिंग फाउंडेशन

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरpollutionप्रदूषणtraffic policeवाहतूक पोलीस