शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

दरोड्याची माहिती पोलिसांना देतो, ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार

By नितीश गोवंडे | Updated: May 8, 2024 14:40 IST

वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या ११ जणांना अटक

पुणे : चोरी व दरोडा टाकल्याची खबर पोलिसांना देतो असा समज करुन ११ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवली. तसेच ‘आम्ही इथले भाई आहोत, कोणाला सोडणार नाही’ असे म्हणत एका ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार करुन जखमी केले. ही घटना हडपसर भागातील रामटेकडी येथील कोठारी व्हिल्सच्या बाजूला सोमवारी (दि. ६) रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह ११ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पंजाबसिंग फौजिसिंग कल्याणी (६५, रा. कोठारी व्हिल्सच्या बाजूला, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रविसिंग शामसिंग कल्याणी, हुकूमसिंग रामसिंग कल्याणी, रामसिंग मोहनसिंग कल्याणी, अजयसिंग हुकूमसिंग कल्याणी, ऐलानसिंग रामसिंग कल्याणी, जिंदालसिंग रामसिंग कल्याणी, हिंदूसिंग रामसिंग कल्याणी, राजूसिंग रामसंग कल्याणी, निहालसिंग शामसिंग कल्याणी, सोनिहालसिंग शामसिंग कल्याणी, बसंतीकौर शामसिंग कल्याणी यांच्यावर आर्म अॅक्ट सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या शेजारी राहतात. चोरी व दरोडा घालत असताना त्याची खबर पोलिसांना देतो असा समज करुन आरोपींनी कटकारस्थान करुन बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी त्यांच्या हातातील लोखंडी तलवार व इतर हत्यारे घेऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच आरोपी रविसिंग कल्याणी याने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात व पायावर तलवारीने वार करुन जखमी केले.तर आरोपी हुकूमसिंग कल्याणी याने फिर्यादी यांच्या नातवाच्या डोक्यात तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. हातातील हत्यारे हवेत उंचावून ‘आज यांची विकेटच पाडायची, कोणी त्यांना सोडवण्यास आले तर त्यांचीही विकेट टाकू. आम्ही इथले भाई आहोत, कोणाला सोडणार नाही’ अशी धमकी आरोपींनी दिली. तसेच फिर्यादी यांच्या मुलाच्या व नातवाच्या दुचाकीवर दगड व विटा मारून नुकसान करुन इतर वाहनांची देखील तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवली. आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये फिर्यादी यांच्या मुलाला व नातवाला मुका मार लागला.

घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी ऐलानसिंग कल्याणी हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खोपोली, रायसनी, नेरळ पोलिस ठाण्यात ९ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSenior Citizenज्येष्ठ नागरिकArrestअटकbikeबाईकcarकार