शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

सणासुदीच्या तोंडावर महागाईने मोडले सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 12:15 IST

सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने त्याचा दसरा-दिवाळीच्या सणावर परिणाम होणार.. 

ठळक मुद्देतूरडाळ, खाद्यतेल, खोबर, भगर, चना डाळीच्या किंमतीत मोठी वाढभाजीपाला, कांदा- बटाटाही आवाक्याबाहेर 

पुणे : ऐन सणासुदीच्या तोडावर जीवनावश्यक, खाद्यपदार्थ, भाजीपाला, कांदा - बटाटा आदी वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले आहे. कोरोनामुळे बहुतेक सर्वच स्तरांतील लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाल्यानंतर वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडेच मोडले आहे.         गेल्या सहा महिन्यांपासून पुण्यासह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे संकट उभे आहे. यामुळे हजारो-लाखो लोकांचे जाॅब गेले असून, लाखो लोकांच्या पगारामध्ये कपात झाली आहे. त्यात वाढलेल्या महागाईमुळे नागरिक अधिकच हैराण झाले आहेत. खाद्यतेल, खोबरे, तुर डाळ, चनाडाळ, भगर आदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.  सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने त्याचा दसरा-दिवाळीच्या सणावर परिणाम होणार होणार आहे .       तीन-चार महिन्यांपूर्वी आवाक्यात आलेले दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत.  खाद्यतेलाचा १५ किलोचा डबा 1550 वरून थेट 1730-1750 वर जाऊन पोहचले आहेत. दररोजच्या जेवणातील तुरडाळ तर तब्बल 90-95 रुपयांवरून थेट 120 रुपये किलोच्या घरामध्ये गेले आहे. खोबर 140 रुपये किलो वरून 160 वर, चणाडाळ 50-55 वरून 75 रुपयांवर पोहचले आहे. शेंगदाणे दाखील 120 रुपये किलो झाले आहेत. भगर 80 रुपयावरून 95 पर्यंत वाढले आहे. तर भिजीपाला, कांदा-बटाटा या अत्यावश्यक वस्तूचे दर तर आवाच्या सावा वाढले आहे. यामध्ये यंदा मान्सून चांगला असल्याने गहू, ज्वारी, तांदूळ आणि अन्य कडधान्यांचे दर मात्र अद्याप स्थिर आहेत. या सर्व महागाईमुळे गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे.  त्यातच पेट्रोल व डिझेलचे दरही वाढले होते. यामुळे चोहोबाजूंनी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे.  ...खाद्यतेलाचे दर 180 रुपयांनी वाढ दसरा- दिवाळीच्या तोडावर खाद्यतेलाच्या 15 किलोच्या डब्यामागे तब्बल 180 रुपयांची वाढ झाली असून, यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे कोथरूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व किरकोळ मालाचे व्यापारी सुनील घेईलोत यांनी सांगितले. यामुळे यंदाच्या सणासुदीवर महागाईची सावट असणार हे नक्की. ----अशी झाली दर वाढ ( प्रतिकिलो) खाद्यपदार्थ              जुनचे दर          ऑक्टोबरचे दर तेलडबा( 15 किलो)    1550                1730तूरडाळ                     90-95              120चणाडाळ                   55                    75खोबरे                       140                  160भगर                        80                    95कांदा                        30-35              40-50बटाटा                       20-25             35-40भाजीपाला गड्डी      10-15              20-25 गहू                          30-32               25 ज्वारी                       स्थिर               स्थिर

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याFamilyपरिवार