शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

भारतातील बहुसांस्कृतिकता आणि बहुभाषिकता ही देशाची खरी ताकद - शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:14 IST

आज आपण ज्या कथा निर्माण करू, त्या उद्याच्या भारताला आकार देतील. अल्गोरिदम आणि विश्लेषणाच्या या युगात, केवळ डेटाच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, यावर विश्वास ठेवणे सोपे आहे

पुणे: देशात मागील काही वर्षांपासून ‘एक राष्ट्र, एक भाषा, एक निवडणूक’ याचीच चर्चा सुरू आहे. वास्तवात भारतातील बहुसांस्कृतिकता आणि बहुभाषिकता ही देशाची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारांचे अभ्यासक, खासदार डॉ. शशी थरूर यांनी केले. त्याचबराेबर शिक्षणातील विविधतेचे महत्त्व अधाेरेखित केले.

निमित्त होते, 'शब्दांची किमया, कल्पना आणि प्रेरणा' या संकल्पनेवर आधारित सिम्बायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस्, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ)तर्फे आयोजिलेल्या सिम्बायोसिस साहित्य महोत्सवाचे. याचे उद्घाटन शनिवारी (दि. ११) सकाळी थरूर यांच्या हस्ते झाले. विमाननगर येथील सिम्बायोसिसच्या ईशान्य सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार होते. याप्रसंगी प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, माजी राजदूत पवन वर्मा, डॉ. श्वेता देशपांडे, अनिता अग्रवाल आदी उपस्थित होते.

डाॅ. थरूर म्हणाले की, आज आपण ज्या कथा निर्माण करू, त्या उद्याच्या भारताला आकार देतील. अल्गोरिदम आणि विश्लेषणाच्या या युगात, केवळ डेटाच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, यावर विश्वास ठेवणे सोपे आहे. परंतु डेटाला एका कथानकाची, तथ्यांना संदर्भाची गरज आहे. सत्य सांगण्याची गरज आहे.  आपल्या मुलांना आपण केवळ कोडिंग शिकवू नये, त्यासाेबत सर्जनशीलता शिकवावी. कथाकथन ही चैनीची नाही तर ती आवश्यक गाेष्ट आहे. साहित्य जागतिक कल्पनांना प्रोत्साहन देते आणि आपल्या सामायिक मानवी अनुभवाला आकार देणाऱ्या विविध कथांना आत्मसात करण्यास मदत करते.

बिहारच्या निवडणुका तोंडावर असतानाही डॉ. थरूर आणि वर्मा यांनी सिंबायाेसिसला वेळ दिली याबद्दल डॉ. विद्या येरवडेकर यांनी त्यांचे आभार मानले. डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले की, लिबरल आर्ट्स कॉलेज सुरू करण्याची प्रेरणा शशी थरूर यांनी दिली. विचाराची दृष्टी व्यापक होण्यासाठी ही शाखा आवश्यक आहे. यातून आत्मविश्वास आणि धाडस प्राप्त होते. लिबरल आर्ट्स तुमचे विचार व्यापक आणि विश्वात्मक करते आणि हास सिंबायाेसिसचा डीएनए आहे. वसुधैव कुटुम्बकम या ध्येयाने आम्ही काम करत आहाेत. अभियांत्रिकी, मेडिकल असाे की अन्य... सर्वच शाखांना लिबरल आर्ट्सचे धडे दिले पाहिजे. पवन वर्मा यांनीही मनाेगत व्यक्त करून सिंबायाेसिसचे धन्यवाद मानले.

English
हिंदी सारांश
Web Title : India's multiculturalism and multilingualism are its strength: Shashi Tharoor

Web Summary : Shashi Tharoor emphasized India's multiculturalism and multilingualism as its strength at Symbiosis Literature Festival. He highlighted the importance of diverse education and storytelling, advocating for creativity alongside coding to shape India's future. Liberal arts broaden perspectives and foster confidence, essential for all disciplines, he noted.
टॅग्स :PuneपुणेShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसsymbiosisसिंबायोसिसCentral Governmentकेंद्र सरकारdigitalडिजिटल