शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

देशात २० हजार कोटींची उसाची एफआरपी थकीत; इस्माची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 5:22 AM

देशात जानेवारीअखेरीस ५१४ साखर कारखान्यांमधून १८५.१९ लाख टन साखर उत्पादित झाली असून, गेल्या वर्षीपेक्षा १४ लाख टन साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे.

- विशाल शिर्केपुणे -  देशात जानेवारीअखेरीस ५१४ साखर कारखान्यांमधून १८५.१९ लाख टन साखर उत्पादित झाली असून, गेल्या वर्षीपेक्षा १४ लाख टन साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. उसाची एफआरपीची देशपातळीवर तब्बल २० हजार कोटी रुपयांची रक्कम जानेवारी अखेरीस थकीत असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यांतही साखर उत्पादन वाढले आहे.ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. राज्यात १५ जानेवारी अखेरीस ५ हजार ३२० कोटींची थकबाकी होती. शेतकरी संघटनांनी एफआरपीसाठी आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २७ जानेवारी रोजी साखर आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलनही केले. त्यानंतर साखर आयुक्तालयाने ३९ साखर कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट बजावले. राज्यात १५ जानेवारी अखेरच्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस सुरू असलेल्या १९० साखर कारखान्यांकडे १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. आंदोलनानंतर कारखान्यांनी ३ हजार २९७ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.राज्यात १९१ कारखान्यांमधून १ फेब्रुवारीअखेरीस ६६१.१८ लाख टन ऊस गाळपातून, ७१ लाख टन साखर उत्पादित झाली. उत्तर प्रदेशात ११७ साखर कारखान्यांमधून ५३.३६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी या काळात ११,९५३.९८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या सरासरी उताºयात ०.८१ टक्के वाढ झाल्याने उत्तर प्रदेशने गेल्या वर्षीची उत्पन्नाची सरासरी गाठली आहे.३५०० ते ३६०० रुपये दर हवासध्या साखरेची किमान आधारभूत किंमत २९०० रुपये प्रतिक्विंटल आहे. कारखान्यांमध्ये सध्या २९ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने साखरेची विक्री सुरू आहे. साखरेच्या उत्पादन खर्चापेक्षा हा दर पाच ते सहा रुपये प्रतिकिलोने कमी आहे. त्यामुळे साखरेची किमान आधारभूत किंमत ३५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल (३५ ते ३६ रुपये किलो ) केली पाहिजे. तरच, शेतकºयांची उसाची देणी कारखान्यांना देता येतील, असे इस्माचे म्हणणे आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेbusinessव्यवसाय