Citizen Amendment Act : 135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज काय?- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 10:56 AM2019-12-21T10:56:10+5:302019-12-21T11:08:23+5:30

Citizen Amendment Act : 135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज नाही. देशात बाहेरून लोक आणण्याची गरज काय?

India no needs more people - Raj Thackeray | Citizen Amendment Act : 135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज काय?- राज ठाकरे

Citizen Amendment Act : 135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज काय?- राज ठाकरे

Next

पुणे-  135 कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज नाही. देशात बाहेरून लोक आणण्याची गरज काय?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाच्या बैठकांसाठी ते दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. राजकीय पक्षांनी विनाकारण राजकारण करू नये, नागरिकत्व कायद्याचं भाजपानंही राजकारण करू नये, स्थानिक मराठी मुस्लिम कधीच आंदोलन करत नाही. इथल्या लोकांच्या चिंता आधी मिटवा, बाहेरून आलेल्या लोकांसंदर्भात पोलिसांना माहिती आहे. पण पोलिसांचे हात बांधलेले असल्यानं ते कारवाई करू शकत नाही. बाहेरच्या लोकांना पोसण्याची गरज नाही. बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या लोकांना हाकललं पाहिजे. 

इथली व्यवस्था कोसळली आहे. जे इथले मुस्लिम नागरिक आहेत त्यांना असुरक्षित वाटण्याचे कारण नाही. मात्र बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळमधून किती मुस्लिम आले हे तपासून बघायला हवे. त्यांच्या सोयी लावण्यासाठी देश नाही. माणुसकीचा ठेका फक्त भारताने घेतलेला नाही. भारत धर्मशाळा नाही. बांगलादेशातील नागरिकांना हाकलून दिलेच पाहिजे. असले कायदे आणून गोंधळ घालायची गरज नव्हती, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. बाहेरच्या देशातले लोक इथे आणण्याची गरज नाही. दरवेळी बॉम्बस्फोट झाल्यावर आपल्याला हे मुद्दे आठवतात. असे काही कडक पावले उचलावे लागतील अन्यथा हा हाताबाहेर गेलेला देश आहे. केंद्र सरकार, भाजप आणि इतर पक्षांनी राजकारण करू नये, असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे. 

राज्यांचा कायदा intestate migration act आहे. यंत्रणा कठोर केली तर अशा कायद्यांची गरज नाही. आहेत त्यांची सोय लागत नाहीये, आपण अजून ओझं घेऊ शकत नाही. भाजप आणि इतर राजकीय पक्ष याला हवा देत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे. 

Web Title: India no needs more people - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.