शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वाढीव पोलीस मनुष्यबळाबाबत स्वतंत्र प्रस्ताव - विश्वास नांगरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 1:28 AM

जिल्ह्यातील ५० ते ६० लाख लोकसंख्येसाठी पोलिसांचे केवळ ३१५० मनुष्यबळ आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे अपुºया असणा-या पोलीस प्रशासनावर ताण येतो. हा ताण टाळण्यासाठी पोलीसबळ वाढविण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : जिल्ह्यातील ५० ते ६० लाख लोकसंख्येसाठी पोलिसांचे केवळ ३१५० मनुष्यबळ आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे अपुºया असणा-या पोलीस प्रशासनावर ताण येतो. हा ताण टाळण्यासाठी पोलीसबळ वाढविण्याची गरज आहे. याबाबत शासनाला सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.बारामती येथे आयोजित बैठकीत नांगरे-पाटील बोलत होते. या वेळी नांगरे-पाटील म्हणाले, की सर्वसामान्य नागरिकांसाठी पोलिसांचा १००, १०९१ क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे याद्वारे कंट्रोल रूमच्या माध्यमातून त्वरित प्रतिसाद देण्याचा प्रयत्न होतो. बारामती एमआयडीसीला स्वतंत्र पोलीस चौकी, पोलीस कर्मचारी देण्याचे विचाराधीन आहे. केवळ सण, निवडणुकीत कार्यरत असणारा गृहरक्षक दलाचा जवान, पोलीसपाटील यांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करता येणे शक्य आहे.बारामतीसारख्या चांगल्या शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत, याबाबत नांगरे पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले. सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गुन्ह्यांचे प्रमाण घटण्यास मदत होईल. तसेच, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे शक्य होईल. छेडछाडीसारख्या प्रकरणांमध्ये २० हजार तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. आर्थिक वगळता सर्वच प्रकारचे गुन्हे तक्रार दिल्यानंतर दाखल करण्याचे पोलिसांना आदेश आहेत, असे नांगरे-पाटील म्हणाले.निर्भया पथकाचे कर्मचारी खासगी वेशात जातात. त्यांना छुपे कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामधून आरोपीच्या सर्व हालचाली ‘रेकॉर्ड’ होतात. त्यानंतर २४ तासांत ‘चार्जशीट’ दाखल होते. १२ दिवसांत २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जलदगतीने ही प्रक्रिया करण्यात आल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. छेडछाड करणाºया युवकांचे, विवाहित पुरुषांचे समुपदेशन करण्यात येते. त्यासाठी युवकांना त्यांच्या आई-वडिलांसमवेत व विवाहित पुरुषांना त्यांच्या पत्नीसोबत बोलाविण्यात येते, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी लोककेंद्रित सेवा देण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक दीपाली केदारी, पोलीस निरीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौंड यांनी आभार मानले....त्या चोराने जोडले सीसीटीव्ही कॅमे-याला हातसीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांवर जरब बसण्यास मदत होते. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याने एकाच्या खिशातील पॉकेटची चोरी केली. मात्र, समोर सीसीटीव्ही लावला आहे. त्यामध्ये हा प्रकार चित्रीत झाला आहे, याची जाणीव त्या चोराला झाली. त्याने तातडीने ते पाकीट खाली टाकले. त्यानंतर पाकिटाची मालकी असणाºया व्यक्तीला पाकीट खाली पडल्याचे सांगितले.जाताना त्या चोराने अक्षरश: सीसीटीव्ही कॅ मेºयालाच हात जोडले. सीसीटीव्हीचा असाही झालेला फायदा एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पािहल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले....बारामती एमआयडीसीला स्वतंत्र पोलीस चौकीबारामती एमआयडीसीला स्वतंत्र पोलीस चौकी, तसेच पोलीस कर्मचारी देण्यासाठी विचाराधीन आहे, यासाठी प्रयत्नशील राहू.तसेच बारामती शहरासाठी १५ वाहतूक पोलीस, वाहतूक पोलीस उपनरीक्षक स्वतंत्र देण्यासाठी पोलीस अधीक्षकांना सूचना देण्यात येतील, असे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे एमआयडीसी क्षेत्राची सुरक्षा, बारामती शहरातील वाहतूक समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे