Independence Day 2023: उजनी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 20:09 IST2023-08-14T19:58:12+5:302023-08-14T20:09:21+5:30
रात्रीच्या वेळी सांडव्यावर सोडण्यात आलेल्या तीन रंगाच्या रोषणाईमुळे धरण जणू भारतीय ध्वज असल्यासारखा भास होतो...

Independence Day 2023: उजनी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई; पाहा VIDEO
इंदापूर (पुणे) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा यंदा समारोप होणार आहे. यानिमित्त देशभरात विविध उपक्रम घेतले जात आहे. घर घर तिरंगा, हा उपक्रमही राबण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साह सर्वत्र दिसणार आहे.
त्या निमित्त पुणे, सोलापूर व मराठवाड्यास जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी सांडव्यावर सोडण्यात आलेल्या तीन रंगाच्या रोषणाईमुळे धरण जणू भारतीय ध्वज असल्यासारखा भास होतो. मागील वर्षी ही अशाच प्रकारे धरणाला रोषणाई करण्यात आली होती.
उजनी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई#ujanidam#IndependenceDay2023pic.twitter.com/A843ohuUFf
— Lokmat (@lokmat) August 14, 2023