शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

पुण्यात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून ग्रंथपालांच्या बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 18:39 IST

महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेऊन पात्रता संंपादन करूनही ग्रंथपालांना हक्काची नोकरी मिळविण्यासाठी उपोषणाला बसावे लागत आहे

ठळक मुद्देवेतनश्रेणीनुसार वेतन मिळावे या मागण्यांसाठी ग्रंथपालांनी उगारले आंदोलनाचे शस्त्र

पुणे : महाराष्ट्र  राज्य ग्रंथपाल महासंघ व आरोग्य व विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून उच्च शिक्षण संचालनालय कार्यालसमोर विविध मागण्यांसाठी ग्रंथपालांच्या बेमुदत साखळी उपोषणास गुरूवारपासून बेमुदत साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली.

भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त 12 ऑगस्ट हा दिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. याचदिवशी देशात ग्रंथपालांचा यथोचित गौरव केला जातो. मात्र, महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेऊन पात्रता संंपादन करूनही ग्रंथपालांना हक्काची नोकरी मिळविण्यासाठी उपोषणाला बसावे लागत आहे, अशी खंत महाराष्ट्र  राज्य ग्रंथपाल महासंघाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र ज्ञानोबा भताने यांनी व्यक्त केली.         अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल पदांची भरती ही प्राचार्य पदाच्या धर्तीवर तात्काळ सुरू करावी. 4 मे 2020 रोजी पदभरती वर निर्बंध लादण्याअगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार पदभरतीची परवानगी (एनओसी) मिळाली आहे अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. तसेच खासगी विनानुदानित संस्थेमधील ग्रंथपालांना समान काम समान वेतन हे धोरण ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेल्या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळावे या मागण्यांसाठी ग्रंथपालांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.

यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष प्रदीप बागल, आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप चोपडे, राजेश अगावणे, डॉ.प्रवीण पंडित, प्रवीण घुले, आनंद नाईक, चित्रांगिनी टाक, सरिता स्थूल, वैशाली पानसरे उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेlibraryवाचनालयEducationशिक्षणStudentविद्यार्थी