इंदापूर तालुक्यात "दुकाने उघडी ठेवून आणली पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 06:53 PM2021-05-03T18:53:46+5:302021-05-03T18:54:15+5:30

लाॅकडाउन नियमांचे उल्लंघन करणार्‍या दहा दुकांनावर कारवाई

In Indapur taluka, "shops were kept open, and it was time to take action against the police" | इंदापूर तालुक्यात "दुकाने उघडी ठेवून आणली पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ"

इंदापूर तालुक्यात "दुकाने उघडी ठेवून आणली पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ"

Next
ठळक मुद्देप्रशासनाकडून कारवाई करण्यात आल्याने व्यापारी वर्गात खळबळ

बाभुळगाव: इंदापूरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सर्व जिल्ह्यांप्रमाणेच इथेही संचारबंदीचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सकाळी ११ पर्यंतच दुकांनाना चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण तालुक्यातील निमगाव केतकी येथे नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुदतीपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवत गर्दी जमवल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून १० दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये ७ दुकानांत गुन्हे दाखल करण्यात आले असून ३ दुकानांना सात दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. अशी माहिती प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली. 

स्थानिक ग्रामस्तरीय समिती निमगाव केतकी व पोलीस प्रशासन यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत लाॅकडाउन नियमांचे उल्लंघन करून मुदतीपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवल्याने संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत.  यामध्ये १) सोमनाथ शिवाजी कुचेकर (कृष्णा ऑनलाईन सर्व्हिसेस) २) तुळशीराम निवृृृृत्ती भोंग (किराणा दुकान), ३) पुरूषोत्तम शंकर भागवत ( पुरूषोत्तम अँड ब्रदर्स किराणा दुकान) ४) उमेश शशिकिंत गोटे.(रेवणसिद्ध ट्रेडींग.किराणा दुकान), ५) सनि प्रकाश भिसे (हाॅटेल शिवम) ६) सुधाकर पांडुरंग भोंग.(हाॅटेल अमोल) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर इंदापूर नगरपरिषद हद्दीतील सूरज शहाजी पोकळे.(महालक्ष्मी हार्डवेअर व  ट्रेंडर्स दोन दुकाने), किसन रामचंद्र काळे ( समाधान गारमेंटस) ही दुकाने सात दिवसासाठी सील करण्याची कारवाई संबंधित प्रशासनाकडून करण्यात आल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. 

Web Title: In Indapur taluka, "shops were kept open, and it was time to take action against the police"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.