शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

इंदापूर तालुक्यात विकासकामांच्या निधीवरून सत्ताधारी आणि माजी मंत्री आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 20:00 IST

अर्थसंकल्पातील भरीव तरतुदीमुळे होतीये जनतेची दिशाभूल तालुक्यातील विकासकामे पूर्ण करण्याचे भरणेंचे स्वप्न

ठळक मुद्देसर्व योजना आगामी काळात मार्गी लावणे भरणे यांच्यासाठी महत्वाचे

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाणीपुरवठा जलसिंचन, रस्तेविकासाठी अर्थसंकल्पात कोट्यवधीची भरीव तरतुद केल्याचे नमुद केले आहे. परंतु ही माहिती वस्तुनिष्ठ नसून जनतेची दिशाभूल करणारी आहे. असा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भरणे यांच्यावर केला आहे. या प्रकरणावरुन इंदापूर तालुक्यात सत्ताधारी आणि माजी मंत्री आमनेसामने आल्याची बाब समोर आली आहे. तसेच मंत्रिपदावरील व्यक्तीने कागदपत्रासह वस्तुनिष्ठ माहिती देणे गरजेचे आहे. गेली दीड वर्षे सत्तेवर असताना पोकळ घोषणा करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी वस्तुनिष्ठ माहीती देवुन शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवावी अशी टीकाही माजी मंत्री पाटील यांनी यावेळी केली आहे. 

तालुक्याचे आमदार भरणे यांचा मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणुन समावेश झाल्यानंतर लाँकडाऊनच्या कालावधीत विकासकामे थांबवण्यात आली होती.  मात्र यावर्षीच्या अर्थसंकल्पात प्रदीर्घ काळ रखडलेली लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेसाठी निधीची तरतूद केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. तसेच रस्ते विकासासाठीही तालुक्यात सुमारे ५०० कोटी रुपयांहुन अधिक निधीची तरतुद झाल्याचे भरणे यांनी रस्ते व गावांच्या नावांसह प्रसिद्द केले.  तालुक्यातील गावांना व वाड्यावस्तीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी २५० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी जाहीर केले. हे सर्व नागरिकांची दिशाभूल करणारे ठरत आहे. असे पाटील यांनी सांगितले. 

मात्र तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या माध्ममातुन अवर्षणप्रवण लाकडी निंबोडी काझड शिंदेवाडी निरगुडे लामजेवाडी म्हसोबावाडी शेटफळगडे या आठ गावंमधील ४६०० हेक्टर क्षेत्राला दीड हजार मीमी व्यासाची बंद पाईपलाईन मधुन पाणी देण्याची नियोजन आहे. अर्थसंकल्पात निधीची घोषणा झाली आहे. तालुक्यातील ३६ गावांना पाणी देणे, बंधारे बांधणे, धरणातून कालव्यात पाणी सोडणे अशी कामे करण्याचे भरणे यांनी सांगितले आहे. सर्व योजना आगामी काळात मार्गी लावणे भरणे यांच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. योजना मार्गी लागल्यास विरोधकांना मोठे आव्हान असणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची पकड यामुळे मजबुत होणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवार