शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

इंदापूर तालुका शेतकरी कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:11 IST

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा निषेध जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा निषेध निमगाव केतकी : जलसंपदा मंत्री ...

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा निषेध

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा निषेध

निमगाव केतकी : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी व २२ गावांचे शेतीचे पाणी देण्याच्या मंजुरीचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता उजनीचे पाणी चांगलेच पेटले आहे. निमगाव केतकी येथे रास्ता रोको आंदोलन करून या निर्णयाचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

तत्पूर्वी येथील संत सावता माळी मंदिर प्रांगणात इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. या वेळी इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने प्रताप पाटील यांनी निषेध व्यक्त केला. पाटील म्हणाले की, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादींच्या नेत्यांबरोबर संवाद साधण्यात येईल. त्यानंतर चर्चा करून इंदापूरच्या हक्काचे ५ टी.एम.सी. पाणी मिळविण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर देखील पाणी न मिळाल्यास सोलापूर जिल्ह्याल्या पिण्याच्या व शेती पाण्याच्या नावाखाली ऑक्टोबरनंतर जाणारे उजनीचे पाणी न्यायालयात जाऊन बंद करण्यात येईल असा इशारा प्रताप पाटील यांनी दिला. निमगाव केतकी येथील संत सावता माळी मंदिर प्रांगणात आज आयोजित इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने आयोजित सभेत बोलत होते.

या वेळी इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संघर्ष करणार आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून २२ गावांना पाणी मिळण्याची आशा होती. पण, राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचे ऐकून आपल्या हक्काचे मिळालेले पाणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. तो निर्णय पुन्हा होईपर्यंत तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा ढोले यांनी दिला.

अ‍ॅड. लक्ष्मण शिंगाडे यांनी नीरा - डावा व खडकवासला कालव्यातून आपल्या भागाला पुरेसे पाणी येत नाही, पुणे वाढते आहे. त्यामुळे भविष्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होईल. त्यासाठी सर्वांनी पेटून उठत राज्यमंत्री भरणे यांच्या पाठीशी उभा राहा. राजकीय आंदोलनातून आपली ताकद दाखवत आपल्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत गप्प बसणार नसल्याचे अ‍ॅड. शिंगाडे यांनी स्पष्ट केले.

या वेळी बाळासाहेब करगळ यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांना सांगितले की, येथून पुढे उजनीच्या ५ टी.एम.सी.पाणी मिळण्यासाठी इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या प्रत्येक आंदोलनास राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित असावेत. जर उपस्थित राहिले नाही तर त्यांचे राजीनामे घ्यावेत.

या वेळी किरण बोरा सराफवाडी, सचिन सपकळ, निमगाव केतकीचे माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, दत्तात्रय घोगरे, अभिजित रणवरे, भजनदास पवार, रासपचे किरण गोफणे, सागर मिसाळ, बसपाचे दीपक भोंग, सावता परिषदेचे संतोष राजगुरू, नानासाहेब खरात यांची भाषणे झाली.

या वेळी काँग्रेसचे नितीन राऊत, तुषार भोंग, प्रहार संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष संजय राऊत, अमोल राऊत, माणिक भोंग, सुरेश बारवकर, अमोल हागडे, अतुल मिसाळ, दादा ठवरे पाटील, दादासाहेब शेंडे, संदीप भोंग, निमगाव केतकी सरपंच प्रवीण डोंगरे, उपसरपंच सचिन चांदणे, अ‍ॅड. सचिन राऊत,दत्तात्रय चांदणे, मच्छिंद्र चांदणे, संतोष जगताप यांच्या सह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

———————————————

...आमदार यशवंत माने यांचा निषेध

इंदापूर तालुक्यातील रहिवासी आणि मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांनी इंदापूरच्या बाजूने उजनीच्या पाण्याबाबत ‘सपोर्ट’ केला नाही. उलट सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांबरोबर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटण्यास जाऊन इंदापूरविरोधी भूमिका घेतली.त्यामुळे मोहोळचे आमदार यशवंत माने यांचा जाहीर निषेध करतो. त्यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात देण्यात येणाऱ्या पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांनी केली.

———————————

...रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी उजनीतील ५ टी.एम.सी. पाणी शेतीसाठी मिळालेच पाहिजे, असे म्हणत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत काही कार्यकर्त्यांनी हातातून काडीपेटी काढून त्याला धरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

—————————————

...राज्य शासनाचा निषेध, भरणेंचा जयजयकार

शेतकरी कृती समितीची काळ्या फिती दंडास बांधून महाराष्ट्र सरकार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा जाहीर निषेध केला. इंदापूर - बारामती रस्ता संत सावतामाळी मंदिरासमोर निमगाव केतकी येथे रोखण्यात आला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जयजयकार,तर राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

—————————————————

फोटो ओळी -- निमगाव केतकी येथे रास्ता रोको करताना इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले , प्रताप पाटील व इतर शेतकरी .

१९०५२०२१ बारामती—०६

—————————————