शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण यात्रा उत्सवाच्या ग्रामसभेत गोंधळ; जेष्ठ नागरिकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:00 IST

वाद सोडविण्यास गेलेल्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की सहन करावी लागली.

भिगवण -  इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या नियोजनासाठी आज शुक्रवारी (दि. ११ एप्रिल) घेण्यात आलेल्या ग्रामसभेत जोरदार गोंधळ उडाला. तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत जेष्ठ नागरिक बाबा धवडे यांना काही तरुणांकडून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.ग्रामसभेत बाबा धवडे यांनी यात्रा सोहळ्यावरील खर्चाबाबत शंका उपस्थित करत, हा सोहळा धर्मादाय आयुक्तालयाच्या प्रशासकाच्या माध्यमातून पार पडावा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर काही क्षणांतच वातावरण तापले आणि बंद दरवाजामागील चर्चेपूर्वीच काही तरुणांनी त्यांना मारहाण केली. यावेळी वाद सोडविण्यास गेलेल्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की सहन करावी लागली.

या सभेस तहसीलदार जीवन बनसोडे, धर्मादाय विभागाच्या प्रज्ञा कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन महांगडे आदी मान्यवर उपस्थित होते. गतवर्षीपासून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली यात्रा कमिटीच्या माध्यमातून बँक खात्यातून खर्चाचे नियोजन केले जात आहे. यंदाही अशीच पद्धत ठेवून दोन दिवसांत वर्गणी संकलन करून नियोजन करण्याचे तहसीलदारांनी सांगितले होते. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून या प्रकाराची दखल घेण्यात येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसBhigwanभिगवणIndapurइंदापूरMaharashtraमहाराष्ट्र