शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लागवडीकडे वाढता कल

By admin | Updated: August 24, 2015 02:50 IST

सध्या बाजारात कांद्याला असणारा उच्चांकी भाव, पाऊस न झाल्याने भूगर्भातील घटलेली पाण्याची पातळी, उसाला लागणारे पाणी व त्याचा कालावधी, त्याचबरोबर

मांडवगण फराटा : सध्या बाजारात कांद्याला असणारा उच्चांकी भाव, पाऊस न झाल्याने भूगर्भातील घटलेली पाण्याची पातळी, उसाला लागणारे पाणी व त्याचा कालावधी, त्याचबरोबर उसाला हमी भाव नसल्याने शिरूर पूर्व भागातील ऊसपट्ट्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडीत मग्न आहे. सध्या घोडनदी कोरडी पडली असून, तेथील पिके मोठ्या प्रमाणावर जळण्याच्या मार्गावरआहेत. परंतु भीमा नदी ही बारमाही वाहणारी नदी असून, या नदीवरील कोल्हापुरी बंधारे असल्याने मांडवगण फराटा, गणेगाव दुमाला, बाभुळसर बु., वडगाव रासाई, सादलगाव, नागरगाव, रांजणगाव सांडस ही गावे येत असून, या गावातील पूर्ण क्षेत्र ओलिताखाली असल्याने कायमस्वरूपी या भागात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते. परंतु यावर्षी उसाच्या बाजार भावाबाबत शेतकऱ्यामध्ये चिंता वाढल्याने व बाजारात चढ्या भावाने कांदा विक्री होत असल्याने तसेच यावर्षी पावसाचे प्रमाण फारच कमी असल्याने कांद्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटणार असे डोळ्यांसमोर ठेवूनच येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडीकडे वळला आहे. सध्या सर्वत्र जनावरांना चारा नाही. त्यासाठी सरसकरट चाऱ्यासाठी उसाचा उपयोग केला जात आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर खोडवा ऊस गुऱ्हाळाला घालून कांदा लागवड करण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या या भागात दिसत आहे. (वार्ताहर)