शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

‘ससून’ च्या रक्तसंकलनात वाढ : ४७ हजारांहून अधिक रुग्णांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 10:30 PM

२०१९ या वर्षात २१ हजारांहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन

ठळक मुद्देससून बाह्यरुग्ण विभागात वर्षाला सुमारे ८ लाख तर आंतररुग्ण विभागात ८० हजार रुग्ण भरती

पुणे : अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या ससून रुग्णालयातील रक्तपेढीतील रक्तसंकलनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये यामध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. २०१९ या वर्षात २१ हजारांहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन झाले आहे. त्याचा फायदा ४७ हजारांहून अधिक रुग्णांना झाला आहे.मागील काही वर्षांपासून ससून रुग्णालयाचा कायापालट होत आहे. हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि जुने शासकीय रुग्णालय आहे. सध्या विविध विभागांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांचा ओढा मागील काही वर्षांपासून वाढला आहे. पुणे व परिसरासह राज्यभरातून विविध उपचारांसाठी रुग्ण ससूनमध्ये दाखल होत आहेत. यातील गरजु रुग्णांना ससूनच्या रक्तपेढीमधून मोफत रक्त दिले जाते. ही रक्तपेढीही आता आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्यात आली आहे. रक्तविघटन प्रक्रियेने रक्ताचे रक्तपेशी व प्लाझ्मा हे दोन मुख्य घटक काढले जातात. गरजेनुसार थॅलॅसेमिया, अ‍ॅनिमिया, अपघातग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज भासते. मागील वर्षभरात ४७ हजार ३१८ रुग्णांना या रक्तपेढीतून रक्त पुरवठा करण्यात आला आहे. रक्तपेढीमध्ये २०१३ यावर्षी एकुण ११ हजार २९६ रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. २०१७ पर्यंत यामध्ये फारशी वाढ झालेली दिसून येत नाही. हे संकलन केवळ ३ हजार पिशव्यांनी वाढले. २०१८ मध्ये मात्र हा आकडा १९ हजाराच्या पुढे गेला. तर मागील वर्षी २१ हजार पिशव्यांचा टप्पा पार केला आहे. यावर्षात संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (५,०५६), रॉबीन हुड आर्मी (११२६), सीओईपी (७०५), व्हीआयटी कॉलेज (५८३), बालाजी युनिव्हर्सिटी (४५७) व भारत फोर्ज (४०७) या संस्थांचे ससून रक्तपेढीसाठी रक्तदानाचे योगदान अधिक राहिले आहे. ससून रक्तपेढीच्या विभागप्रमुख डॉ. लिना नकाते, रक्तपेढी प्रमुख डॉ. नलिनी काडगी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाºयांकडून रक्तदानात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.-----------ससूनमधील बाह्यरुग्ण विभागात वर्षाला सुमारे ८ लाख तर आंतररुग्ण विभागात ८० हजार रुग्ण भरती होतात. तसेच वर्षाला सुमारे २० हजार लहान मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. रक्तपेढीमधूनही वर्षभरात ४७ हजारांहून अधिक रुग्णांना रक्तपुरवठा केला आहे. समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने सर्वांनी रक्तदान करायला हवे.- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय------------

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलBlood Bankरक्तपेढी