शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील 'त्या' राजकीय अध्यात्मिक गुरुच्या पोलीस कोठडीत वाढ; आणखी दोन ज्योतिषांचीही नावं आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:53 IST

प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी या राजकीय अध्यात्मिक गुरूला अटक करण्यात आली होती.

पुणे : प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करायला प्रवृत्त गेल्याप्रकरणी अटक केलेले अध्यात्मिक गुरू रघुनाथ राजाराम येमूल (४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर) याच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणात चेन्नई येथील आर. सी. बेसल व शहरातील जॉन या ज्योतिषांचीही नावे समोर आली आहेत.याकडे पीडितेच्या पतीने भविष्याबाबत विचारणा केली होती. तसेच, त्यांनी चांगली व वाईट वेळ याबाबत कथन केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी न्यायालयाला दिली.

आरोपीच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने येमूल याला सोमवारी (दि. १२) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. संबंधित गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे.येमूल हा तपासास सहकार्य करीत नाही. त्याने आरोपींच्या संगनमताने संसार मोडण्यासाठी कट केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तिचा पती येमूल याच्या संपर्कात होता. तसेच ते दोघेही तिरूपती बालाजी याठिकाणी सोबत असल्याचे छायाचित्र उपलब्ध आहे. त्यामुळे, पीडितेचा पती कोठे आहे याबाबतची माहिती आरोपीला असून, गुन्ह्याच्या अधिक तपास करण्यासाठी येंमुल याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अ‍ॅड. मुरळीकर यांनी न्यायालयाला केली.

उच्चशिक्षित सुनेला सिगारेटचे चटके देत, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण करणाऱ्या उद्योजक पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय ३६) व कुटुंबातील तिघांसह आठ जणांविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना तात्पुरता अटकपूर्व जामीन झाला असून, पती गणेश आणि राजू अंकुश हे फरार झाले आहेत. याबाबत २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

--------------------------- 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटक