मंगळवारी शहरात ६६१ कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:30+5:302021-02-24T04:12:30+5:30

पुणे : शहरात सोमवारी ३२८ वर आलेली कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी पुन्हा दुप्पट झाली असून, आज शहरात नव्याने ६६१ कोरोनाबाधित ...

An increase of 661 corona victims in the city on Tuesday | मंगळवारी शहरात ६६१ कोरोनाबाधितांची वाढ

मंगळवारी शहरात ६६१ कोरोनाबाधितांची वाढ

Next

पुणे : शहरात सोमवारी ३२८ वर आलेली कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी पुन्हा दुप्पट झाली असून, आज शहरात नव्याने ६६१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आज दिवसभरात ४ हजार ६०६ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही १४़ ३५ टक्के इतकी आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसातवाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ३९८ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २०१ इतकी आहे़ तर आज दिवसभरात ३५८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ३ हजार २०१ इतकी झाली आहे़

शहरात आजपर्यंत ११ लाख ०८ हजार १५४ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९८ हजार ९५३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९० हजार ९१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८३४ जणांचा मृत्यू झाला आहे़

--------------------------

Web Title: An increase of 661 corona victims in the city on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.