गुरुवारी ३५५ कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:31 IST2020-12-04T04:31:24+5:302020-12-04T04:31:24+5:30

पुणे : शहरात गुरूवारी ३५५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३७८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ४६५ ...

An increase of 355 corona sufferers on Thursday | गुरुवारी ३५५ कोरोनाबाधितांची वाढ

गुरुवारी ३५५ कोरोनाबाधितांची वाढ

पुणे : शहरात गुरूवारी ३५५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३७८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ४६५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, आजची पॉझिटिव्हची टक्केवारी ही १०़ २४ टक्के इतकी आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४२२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २५५ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार १६५ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ३६४ इतकी आहे़ आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला असून, यातील ३ जण पुण्याबाहेरील आहे़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ४७१ इतकी झाली आहे़

शहरात आजपर्यंत ८ लाख २९ हजार ८६७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७१ हजार ५२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ६१ हजार २१० जण कोरोनामुक्त झाले आहेत़

==========================

Web Title: An increase of 355 corona sufferers on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.