शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Aniruddha Deshpande | सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर Income Tax विभागाची धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 14:52 IST

एफसी रोडवरील सिटी ग्रुपच्या ऑफिसवर छापे मारण्यात आले आहेत...

पुणेपुण्यात आयकर विभागाने आज मोठी कारवाई केली आहे. सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कम्युनिकेशन अर्थात, बीबीसी या वृत्तसंस्थेवर पडलेल्या छाप्यांमुळं देशभरात चर्चा सुरू असतानाच आज आयकर विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली. सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. एफसी रोडवरील सिटी ग्रुपच्या ऑफिसवर छापे मारण्यात आले आहेत.

देशपांडे यांच्या सिटी ग्रुपशी संबंधित आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. यात डेक्कन आणि मगरपट्ट्याजवळ अ‍ॅमनोरा येथील कार्यालयांचा समावेश आहे. प्राप्तीकर खात्याचे अधिकारी इथं झाडाझडती घेत आहेत.

शरद पवारांचे निकटवर्तीय-

सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे जवळचे मानले जातात. आयकर विभागाने आज सकाळपासून अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले आहेत.

सिटी ग्रुपचे सर्वेसर्वा-

सिटी ग्रुप हा पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एका आघाडीचा समूह आहे. अनिरुद्ध देशपांडे यांनी सिटी ग्रुपची स्थापना केली असून ते या समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. पुण्यात सिटी ग्रुपचे अनेक व्यावसायिक व रहिवासी प्रकल्प साकारले आहेत.

टॅग्स :PuneपुणेIncome Taxइन्कम टॅक्सraidधाडdeccan gymkhanaडेक्कन जिमखानाPoliceपोलिस