शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

‘ पीएमपी ’चे उत्पन्न अन् प्रवासीसंख्याही ठरेल विक्रमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 1:19 PM

सोमवारी ‘बस डे ’ निमित्त प्रवाशांना अनपेक्षितपणे सुखद धक्का देत

ठळक मुद्देप्रत्यक्षात सकाळच्या सत्रात १८०० हून अधिक बस मार्गावर बस डेला मिळालेल्या प्रतिसादामुळे हा आकडा दोन कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता

पुणे : प्रवाशांना अनपेक्षितपणे सुखद धक्का देत पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सोमवारी ‘बस डे ’ निमित्त विक्रमी १८३३ बस मार्गावर आणल्या. काही अपवाद वगळता प्रवाशांना नियमित वेळापत्रकानुसार बस उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रवासीसंख्या आणि उत्पन्नातही विक्रमी कामगिरीचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पीएमपीच्या ताफ्यात मागील दोन वर्षांमध्ये नवीन बसची संख्या वाढली आहे. तसेच चालक व वाहकही पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने प्रशासनाने सोमवारी बस डे राबवित सर्वाधिक बस मार्गावर आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार किमान १७०० बस मार्गावर येतील, असा दावा करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात सकाळच्या सत्रात १८०० हून अधिक बस मार्गावर आल्या. दररोज सुमारे १५०० ते १५५० बस मार्गावर येतात, तर नियमित शेड्यूल १७०० बसचे असते. पण बस डे निमित्त प्रशासनाने शेड्यूलपेक्षा १०० हून अधिक जादा बस मार्गावर आणल्याने विविध मार्गांवरील प्रवाशांना दिलासा मिळाला. ........दुपारपर्यंत साडेआठ लाख प्रवासी‘पीएमपी’ला दुपारपर्यंत सुमारे साडेआठ लाख प्रवाशांनी प्रतिसाद दिला. इतर दिवशी हा आकडा सुमारे साडेसहा लाखएवढा असतो, तर दिवसभरातील एकूण उत्पन्न १ कोटी ५० लाख ते १ कोटी ६० लाखांपर्यंत जाते. बस डेला मिळालेल्या प्रतिसादामुळे हा आकडा दोन कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दररोजचे एकूण प्रवासी ११ ते १२ लाख एवढे असतात. बस डेमुळे हा आकडा १३ ते १४ लाखांवर जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. .........आता ९ मार्चला बस डेनियमित शेड्यूलपेक्षा जास्त बस मार्गावर आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो. प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यामुळे यापुढे प्रत्येक महिन्यात बस डे राबविला जाईल. यापुढील बस डे दि. ९ मार्च रोजी होईल. अधिकाधिक बस मार्गावर आणून प्रवाशांना चांगली सेवा देणे हा यामागचा उद्देश आहे. यापुढे बस डेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल. बसचा नागरिकांनी वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. - अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी........बस डे’ची स्थिती एकूण शेड्यूल - १७०३प्रत्यक्ष मार्गावरील बस १८३३इतर दिवशीपेक्षा जास्त बस - सुमारे ३००पीएमपी मालकीच्या - १३६७भाडेतत्त्वावरील - ४६६उत्पन्न (दुपारी ३ पर्यंत) - तिकीट विक्री - ७४,५१,७६३पास विक्री - २५,७४,५४८दिवसभराचे अपेक्षित उत्पन्न - १ कोटी ९० लाख ते २ कोटीदिवसभराची अपेक्षित प्रवासीसंख्या - १३ ते १४ लाख 

...........................

इतर दिवशीदैनंदिन बस - १४५० ते १५५०उत्पन्न - १ कोटी ६० लाखप्रवासीसंख्या - ११ ते १२ लाख.............

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासी