समाविष्ट गावे अंधातरीच; पुणे महापालिकेचे नियोजन नसल्याचे सर्वसाधारणसभेत स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:42 IST2017-12-20T19:34:16+5:302017-12-20T19:42:19+5:30

समाविष्ट गावांबाबत महापालिकेचे काहीच नियोजन नसल्याचे बुधवारच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. राजाभाऊ लायगुडे यांनी यावर प्रशासानाकडे विचारणा केली होती.

The included villages are uncertain; concept clear in General public meeting in Pune Municipal Corporation | समाविष्ट गावे अंधातरीच; पुणे महापालिकेचे नियोजन नसल्याचे सर्वसाधारणसभेत स्पष्ट

समाविष्ट गावे अंधातरीच; पुणे महापालिकेचे नियोजन नसल्याचे सर्वसाधारणसभेत स्पष्ट

ठळक मुद्देविसर्जीत ग्रामपंचायतींमधून महापालिकेत वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांना ४ महिने वेतनच नाहीराजाभाऊ लायगुडे यांनी यावर प्रशासानाकडे केली होती विचारणा

पुणे : समाविष्ट गावांबाबत महापालिकेचे काहीच नियोजन नसल्याचे बुधवारच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले.
राजाभाऊ लायगुडे यांनी यावर प्रशासानाकडे विचारणा केली होती. विसर्जीत ग्रामपंचायतींमधून महापालिकेत वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांना ४ महिने वेतन मिळालेले नाही, त्यांचे हाल सुरू आहे, याची जबाबदारी कोण घेणार असे त्यांनी विचारले.
सचिन दोडके, युवराज बेलदरे यांनीही हाच प्रश्न प्रशासनानाला विचारला. गावांमध्ये सार्वजनिक आरोग्य चे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप त्यांनी केला.
अतिरिक्य आयुक्त शीतल तेली-उगले यांनी तातडीच्या अशा सर्व सेवा दिल्या जात असल्याचे स़ागितले. अन्य बाबीं संदर्भात निधी वर्गीकरण करण्याचे प्रयत्न आयुक्त स्तरावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लायगुडे यांशी वेतनाचे काय असे पुन्हा विचारल्यावर महापौरांनी प्रशासनाने खुलासा केला आहे असे सांगून सभेचे पुढील कामकाज सुरू केले. त्यामुळे पुढे या विषयावर काहीच चर्चा झाली नाही.

Web Title: The included villages are uncertain; concept clear in General public meeting in Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.