सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून मिळणार १०० कोटीची निधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:15 PM2017-12-20T12:15:53+5:302017-12-20T12:21:22+5:30

सोलापूर विद्यापीठाला रुसाकडून (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) १०० कोटींचा निधी मिळणार आहे. या निधीतून सेंटर फॉर स्मार्ट सिटीची उभारणी करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये आवश्यक बाबींवर संशोधन केले जाणार आहे.

Solapur University will get Rs 100 crore fund through National Higher Education Campaign | सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून मिळणार १०० कोटीची निधी !

सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून मिळणार १०० कोटीची निधी !

googlenewsNext
ठळक मुद्देस्मार्ट सिटीमध्ये आवश्यक बाबींवर संशोधन केले जाणार सोलापूर विद्यापीठाने यापूर्वी रुसाकडे २७३ कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला होतासंशोधनाचा उपयोग सोलापूरसह देशातील सर्व स्मार्ट सिटीला होणार स्मार्ट सिटीसाठीच्या संकल्पनेला अंतिम स्वरूप देण्याचे काम यातून केले जाणार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २०  : सोलापूर विद्यापीठाला रुसाकडून (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) १०० कोटींचा निधी मिळणार आहे. या निधीतून सेंटर फॉर स्मार्ट सिटीची उभारणी करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये आवश्यक बाबींवर संशोधन केले जाणार आहे.
सेंटर फॉर स्मार्ट सिटीसाठी २१ डिसेंबर रोजी सोलापूर विद्यापीठाकडून रुसाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. सोलापूर विद्यापीठाने यापूर्वी रुसाकडे २७३ कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता, यावर रुसाने १०० कोटी देण्याचे मान्य केले असून, यासाठीचा नवा प्रस्ताव देण्यास सांगितले आहे.
स्मार्ट सिटी संबंधित संशोधन व इतर कामांसाठी रुसाने दिलेल्या १०० कोटींचा वापर तीन वर्षांसाठी केला जाणार आहे. सोलापूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाल्यामुळे सेंटर फॉर स्मार्ट सिटीला मोठे महत्त्व येणार आहे. सोलापूर विद्यापीठाकडून केल्या जाणाºया संशोधनाचा उपयोग सोलापूरसह देशातील सर्व स्मार्ट सिटीला होणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये आवश्यकअसणाºया सेवा व वस्तू याबद्दल संशोधन करण्यात येणार आहे.
--------------------
संशोधनातून विद्यापीठाला उत्पन्नही मिळणार
सेंटर फॉर स्मार्ट सिटीची इमारत १० हजार चौरस मीटरच्या क्षेत्रात उभी केली जाणार आहे. या सेंटरचा वापर सोलापूर विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी व शिक्षकांना करता येणार आहे. रुसा योजनेतून सोलापूर विद्यापीठाला तीन वर्षांसाठी १०० कोटी मिळणार आहेत. या तीन वर्षांनंतर सेंटर फॉर स्मार्ट सिटी पूर्ण होईल. विविध बाबींवर सल्ला देणे व सुविधा देणे यातून विद्यापीठाला उत्पन्नही मिळणार आहे.
----------------
मनपाच्या स्मार्ट सिटी उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाचे नेहमीच सहकार्य असेल. स्मार्ट सिटीसाठीच्या संकल्पनेला अंतिम स्वरूप देण्याचे काम यातून केले जाणार आहे. यासाठी सोलापूर विद्यापीठ १९ विविध प्रकल्पांवर काम करणार आहे. राज्यातील प्रत्येक विद्यापीठाला ‘रुसा’च्या माध्यमातून असे संशोधन करायचे आहे, यामुळे प्रत्येक विद्यापीठात त्याच प्रकारचे संशोधन न होता नवीन संकल्पना प्रत्यक्षात येतील.
- डॉ. गणेश मंझा, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ

Web Title: Solapur University will get Rs 100 crore fund through National Higher Education Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.