शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील घटना! जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद, पाठलाग करत कोयत्याने सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:05 IST

Pune Crime: पुणे शहरात पुन्हा एकदा कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Pune Crime: पुणे शहरात एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. दोन जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयत्यानेच अनेक वार केले. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण असे दोन्ही मित्रांची नावे आहेत. चेतन चव्हाण याने आदित्य कांबळेवर कोयत्याने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आदित्यला ३० टाके पडले आहेत. 

दोन मित्रांमध्ये टोकाचा वाद, नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरामध्ये २ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता ही घटना घडली आहे. 

आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे दोघे चांगले मित्र आहेत. दोघेही २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी भारती विद्यापीठ परिसरात असलेल्या एका रसवंती गाडीजवळ उभे होते. गप्पा मारत असतानाच त्यांच्यात जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. 

आठवण निघाली म्हणून त्या मैत्रिणीला कॉल करायचं ठरलं आणि तिथेच वादाची ठिणगी पडली. त्या मैत्रिणीला कॉल कोण करणार यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेला आणि चेतन चव्हाण थेट तिथला कोयताच घेतला.

भररस्त्यात आदित्यवर कोयत्याने वार

चेतन चव्हाणने कोयता घेतल्यानंतर आदित्य कांबळे पळाला. त्याचा चेतनने पाठलाग केला आणि गाठले. त्यानंतर चेतनने आदित्यवर सपासप वार करण्यास सुरूवात केली. आदित्यने हाताने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो रस्त्यावर पडला. चेतन मात्र वार करतच होता. 

चेतनने केलेल्या हल्ल्यात आदित्य गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला ३० टाके पडले असून, डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्यच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल न करता धारदार शस्त्राने गंभीर दुखापत केल्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Argument over calling female friend leads to brutal attack.

Web Summary : A dispute in Pune over calling a mutual female friend escalated, resulting in one man attacking another with a sickle. The victim sustained serious injuries and is hospitalized; police are investigating the incident.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीbharti universityभारती विद्यापीठcctvसीसीटीव्हीPoliceपोलिस