शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ठरलं! आषाढी वारीसाठी पालख्यांच्या प्रस्थान ते स्वगृही सुरक्षित पोहचविण्याची इंसिडेंट कमांडरकडे जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 20:40 IST

आषाढी यात्रेसाठी पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत नियोजन करण्याकरीता इंसिडेंट कमांडर यांची नियुक्ती करणे आवश्यक...

आळंदी : आषाढी यात्रेसाठी पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरिता इंसिडेंट कमांडरची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.

आषाढी एकादशीला सर्वात मोठी यात्रा पंढरपूर येथे भरते. सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना शासनाने निर्गमित केलेली आहे. त्याअनुषंगाने आषाढी यात्रेसाठी पुणे जिल्हयातून श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, (श्रीक्षेत्र आळंदी देवाची), श्री. संत तुकाराम महाराज संस्थान (श्रीक्षेत्र देहू), श्री. संत सोपानदेव महाराज संस्थान (श्रीक्षेत्र, सासवड), श्री. संत चांगवटेश्वर देवस्थान (श्रीक्षेत्र, सासवड) या चार पालख्या आठ बसेसव्दारे प्रस्थान करणार आहेत. पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता इंसिडेंट कमांडर यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार अधिकाऱ्यांची इंसिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. 

नियुक्त इंसीडेंट कमांडर यांनी आषाढी यात्रा २०२१ च्या अनुषंगाने शासनाकडील व विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडील सुचनांनुसार पुणे जिल्हयातील मंजूर चार देवस्थानच्या पालख्यांच्या प्रस्थानाच्या अनुषंगाने सुरुवातीपासून ते पंढरपूर येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सर्व कार्यवाही इंसिडेंट कमांडर यांनी करायची आहे. संबंधीत उपविभागीय अधिकारी(इंसीडेंट कमांडर ) यांनी संस्थानांच्या प्रमुखांशी विचारविनिमय करून पादूकांचा मार्ग निश्चित करुन याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाशी व सोलापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून योग्य ते नियोजन करावे, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आदेशीत केले आहे. 

नियुक्ती याप्रमाणे : १) श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी -  खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण.२) श्री. संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू - हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर.३) श्री. संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड  - पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड. ४) श्री. संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र, सासवड - पुरंदरचे नायब तहसिलदार उत्तम बढे.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpur Wariपंढरपूर वारी