पुणे : महापालिकेच्या वतीने तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन विस्तारीत प्रशासकीय इमारतीच्या सभागृहाला उद्घाटनच्या दिवशीच गळती लागली. तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन यावरून विरोधकाकडून गुरुवार (दि.२८) रोजी होणा-या मुख्यसभेत सत्ताधारी भाजपला चांगलेच धारेवर धरण्यात येणार आहे. याशिवाय खागसी कंपन्यांच्या प्रस्तावावर वेळेत अभिप्राय न दिल्याने पीएमपीएलच्या कोणत्याही प्रस्तावांवर निर्णय घेऊ नका, असे भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या लेखी पत्रावरून देखील विरोधक भाजपची कोडी करण्याची शक्यता आहे. यामुळे गुरुवारी होणारी सर्वसाधारण सभा चांगली जागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे काम पूर्ण झाले नसताना सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी अति घाईगडबड करून उद्घाटनाचा घाट घातला. यासाठी देशाचे उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परंतु भाजपच्या कारभारामुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमातच सभागृहाला गळती लागली अन् महापालिकेची नाच्चकी झाली. तसेच अत्यंत थाटात उद्घाटन करताना योग्या नियोजन न केल्याने अनेक नगरसेवकांना व शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना उपस्थित राहता आले नाही. यामुळे देखील अनेक सदस्य नाराज झाले असून, या भोंगळ कारभारावरून भाजपला धारेवर धरण्यात येणार आहे. दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष यांनी महापौर मुक्ता टिळक यांना लेखी पत्र देऊन एखाद्या प्रस्तावावर निर्णय घेऊ नका असे सांगणेच अत्यंत चुकीचे असून, पक्षाच्या वतीने थेट महापालिकेच्या कारभारात ढवळाढवळ सुरु केली आहे. याचा देखील जोरदार निषेध करुन योगावले यांच्या ‘एंजेन्टगीरीवर खडाजगी होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्लॅस्टिक बंदीनंतर प्रशासनाकडून सुरु असलेल्या चुकीच्या कारवाईबाबत देखील विरोधक सत्ताधा-यांना लक्ष करणार आहेत. यामुळे गुरुवारी होणारी मुख्यसभा चांगली गाजण्याची शक्यता आहे.---------------------
उद्घाटन कार्यक्रमातील गळतीपात्रावरुन मुख्यसभा वादळी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 21:19 IST
महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे काम पूर्ण झाले नसताना सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी अति घाईगडबड करून उद्घाटनाचा घाट घातला होता.
उद्घाटन कार्यक्रमातील गळतीपात्रावरुन मुख्यसभा वादळी होणार
ठळक मुद्देगोगावले यांच्या पत्रावरून विरोधक करणार भाजपची कोडीप्लॅस्टिक बंदीनंतर प्रशासनाकडून सुरु असलेल्या कारवाईबाबत विरोधक सत्ताधा-यांना लक्ष करणार