लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरचा पदग्रहण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:04+5:302021-08-23T04:14:04+5:30

याप्रसंगी माजी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल दीपक शहा, पदग्रहण अधिकारी म्हणून प्रथम उपप्रांतपाल राजेश कोठावदे, तर शपथविधी अधिकारी म्हणून ...

Inauguration Ceremony of Lions Club of Rajgurunagar | लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरचा पदग्रहण समारंभ

लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरचा पदग्रहण समारंभ

याप्रसंगी माजी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल दीपक शहा, पदग्रहण अधिकारी म्हणून प्रथम उपप्रांतपाल राजेश कोठावदे, तर शपथविधी अधिकारी म्हणून माजी जिल्हा खजिनदार संतोष सोनावळे यांच्यासह रिजन चेअरपर्सन राजश्री शहा, झोन चेअरमन प्रकाश मुटके आदी उपस्थित होते.

या वेळी कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना व पॅथॉलॉजी तंत्रज्ञ यांना ''कोरोना वॉरियर'' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच राजगुरुनगर ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत सायकल प्रवास करणारे सायकलवीर कृणाल रावळ, सहा वेळा प्लाझ्मा दान करणारे सदाशिव आमराळे व ढोरे-भांबुरवाडीचे सरपंच दत्तात्रय ढोरे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त दावडी ग्रामपंचायतीस व आरोग्य केंद्रास सॅनिटायजर वाटप, विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश, अंगणवाडी विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिन व कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप, गरजूंना गॅस सिलिंडर वाटप आदी उपक्रम करण्यात आले.

अंबर वाळुंज यांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य, पाणी शुध्दीकरण, वृक्ष लागवड व समाजातील दुर्बल घटकासाठी मदत केली जाईल असे सांगितले. यावेळी ८ नूतन सदस्यांनी क्लबचे सभासदत्व स्वीकारले. कार्यक्रमाचे नियोजन नितीन दोंदेकर, ॲड. संदीप भोसले, रमेश बोऱ्हाडे, मिलिंद आहेर, डॉ. विजय आंबरे, धिरज कासवा यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड व अक्षता कान्हूरकर यांनी केले, तर आभार डॉ. सागर गुगलीया यांनी मानले.

Web Title: Inauguration Ceremony of Lions Club of Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.