Pune: वाघोली परिसरात नवजात अर्भकाला जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 09:15 IST2023-10-11T09:15:33+5:302023-10-11T09:15:55+5:30
वाघोलीत सापडले बेवारस मृत अर्भक...

Pune: वाघोली परिसरात नवजात अर्भकाला जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस
पुणे : नगर रस्त्यावर वाघोली परिसरात नवजात अर्भकाला जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवजात अर्भकाच्या पालकत्वाची जबाबदारी न स्वीकारता त्याला बेवारस अवस्थेत सोडून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात अर्भकाचा जन्म अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अर्भकाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. वाघोलीतील विठ्ठलवाडी परिसरात नवजात अर्भक जमिनीत पुरल्याचे उघडकीस आले. नागिरकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नवजात अर्भकाला त्वरित रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक प्रियंका पवार तपास करत आहेत.