शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

पुण्यातील आघाडीचे पराभूत उमेदवार EVM विरोधात सर्वोच्च न्यायालयात; शरद पवारांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:12 IST

निकालाच्या विरोधात नाही तर इव्हीएममधील मतमोजणीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार

पुणे: जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी इव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने यासंदर्भात दिल्लीत झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल तसेच काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार अभिषेक मनू सिंघवी त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीला प्रशांत जगताप (हडपसर), दत्ता बहिरट (शिवाजीनगर), रमेश बागवे (कॅन्टोन्मेट), अश्विनी कदम (पर्वती), संजय जगताप (पुरंदर) उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील (इंदापूर), संग्राम थोपटे (भोर), रमेश थोरात यांनी बैठकीत ठरेल त्या निर्णयाबरोबर असल्याचे कळवले आहे. त्याशिवाय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (संगमनेर) हेही या बैठकीला उपस्थित होते. मंगळवारी दुपारी या उमेदवारांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यामध्ये पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. इव्हीएमबाबत सर्वांनीच संशय व्यक्त केला. त्यासंबंधीची आकडेवारीही त्यांनी सादर केली. पवार यांनी त्यानंतर अभिषेक मनू सिंघवी यांच्याबरोबर संपर्क साधला. तसेच केजरीवाल यांच्याबरोबर दूरध्वनीवर चर्चा केली.

सिंघवी हे सर्वोच्च न्यायालयातील नावाजलेले वकील आहेत. त्यांनी मंगळवारी सायंकाळी पवार यांच्या समवेत या उमेदवारांची भेट घेऊ, असे सांगितले. त्याप्रमाणे मंगळवारी रात्री उशिरा ही बैठक होणार आहे. निकालाच्या विरोधात नाही तर इव्हीएममधील मतमोजणीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाला कळवूनही ते मतमोजणीबाबत आवश्यक ती माहिती देण्यास तयार नाहीत, त्यासाठीचे पैसे जमा केल्यानंतरही त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही, विशिष्ट संख्येतील यंत्रांमधीलच व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. लोकशाही व्यवस्थेत निकालाबाबत पारदर्शकता असणे गरजेचे आहे, या मुद्द्यावरून याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMahayutiमहायुतीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग