PMC: पुण्यात डोळ्याची साथ वेगाने वाढतेय, साडेचार हजारांना बाधा; ३ हजार ड्रॉप पालिकेच्या दवाखान्यात

By निलेश राऊत | Published: August 8, 2023 06:49 PM2023-08-08T18:49:02+5:302023-08-08T18:49:23+5:30

शहरात डोळे आलेल्यांची संख्या साडेचार हजार पेक्षा अधिक असल्याची दाट शक्यता आहे....

In the records of the Municipal Corporation, four and a half thousand people in Pune have eye support | PMC: पुण्यात डोळ्याची साथ वेगाने वाढतेय, साडेचार हजारांना बाधा; ३ हजार ड्रॉप पालिकेच्या दवाखान्यात

PMC: पुण्यात डोळ्याची साथ वेगाने वाढतेय, साडेचार हजारांना बाधा; ३ हजार ड्रॉप पालिकेच्या दवाखान्यात

googlenewsNext

पुणे : डोळयांच्या साथी ने सध्या अख्खा महाराष्ट्र हैराण झाला असून, एकट्या पुणे शहरात तब्बल साडेचार हजार लोकांना डोळे आले असल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. दरम्यान डोळे आलेले अनेक रुग्ण परस्पर मेडिकल मध्ये जाऊन औषधे घेत असून, अनेक जण खाजगी क्लीनिक मध्ये ही जाऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरात डोळे आलेल्यांची संख्या साडेचार हजार पेक्षा अधिक असल्याची दाट शक्यता आहे.

डोळे येण्याचे प्रमाण शहरात दिवसेंदिवस वाढत असून, खबरदारी म्हणून महापालिकेने मंगळवारी महापालिकेच्या सर्व दवाखान्यात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ३ हजार ड्रॉप पाठविले आहेत. डोळे आल्यावर नागरिकांनी स्वतःच्या मनाने मेडिकल मध्ये जाऊन औषधे घेऊ नयेत. सध्या अनेक नागरिक डोळे आल्यावर जुन्या पध्दतीने मेडिकल मधून "लिंबोळ्या" टाकून घरगुती उपाय करीत आहेत. पण हे योग्य नसून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळे तपासणी करून औषधे घेणे आवश्यक असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

शहरातील १७७ शाळांमध्ये तपासणी, १३९९ विद्यार्थी बाधित

महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील १ ऑगस्ट पासून आजपर्यंत १७७ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी केली आहे. यामध्ये १ हजार ३९९ विध्यार्थ्यांना डोळे आल्याचे आढळून आले.

डोळे आल्यावर ही घ्या काळजी-
* वैयक्तिक स्वच्छता ठेवणे
* वारंवार हात धुणे
* वारंवार डोळ्यांना हात न लावणे
*  डोळे आलेल्या व्यक्तीने इतरांच्या संपर्कात न येणे.
  घरातच विलगीकरणात राहणे.
* परिसर स्वच्छता ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे

डोळे येऊ नये म्हणून घ्यावी 'ही' काळजी-
डोळे येणे हा काही गंभीर आजार नाही. परंतु डोळे आल्यावर किमान तुमचा एक आठवडा वाया जातो. त्यामुळे डोळे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. 

महापालिकेच्या अथवा खाजगी शाळेत एका वर्गात ४० ते ५० विद्यार्थी असतात. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शाळांमध्ये अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. डोळे आल्यावर डोळ्यांना हात लावणे, एकत्र खेळणे, एकमेकांच्या  वस्तू वापरले जाणे हे प्रमाण शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. परिणामी डोळे येण्याची साथ वाढू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
 -डॉ. सूर्यकांत देवकर (सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महापालिका)

डोळे लाल होणे, चिकट पदार्थ डोळ्यांतून बाहेर पडणे, पापण्यांना सूज येणे ही डोळे येण्याची लक्षणे आहेत. अशावेळी वारंवार हात धुणे, डोळ्यांना सारखा हात न लावणे, डोळे आलेल्या व्यक्तीचे टॉवेल, रुमाल वापरू नये. 

- डॉ. बबन साळवे, बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन

Web Title: In the records of the Municipal Corporation, four and a half thousand people in Pune have eye support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.