डंपर अन् दुचाकीचा भीषण अपघात; गाडीवर आईसोबत असणारा मुलगा जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 21:34 IST2023-12-27T21:33:19+5:302023-12-27T21:34:58+5:30
फुरसुंगी , मंतरवाडी चौक ते हांडेवाडी रोड याठिकाणी एका डंपर गाडीचा एक्टिवा या दुचाकी वाहनाला धक्का बसला. या अपघातात ...

डंपर अन् दुचाकीचा भीषण अपघात; गाडीवर आईसोबत असणारा मुलगा जागीच ठार
फुरसुंगी , मंतरवाडी चौक ते हांडेवाडी रोड याठिकाणी एका डंपर गाडीचा एक्टिवा या दुचाकी वाहनाला धक्का बसला. या अपघातात गाडीवर आईसोबत असणारा मुलगा जागीच ठार झाला. याबाबत अधिक माहिती अशी , दुचाकीवर पाठीमागे बसणारा शौर्य सागर आवळे, वय 07 वर्ष, रा. आवळवाडी वाघोली हा जागीच ठार झाला .
कोमल सागर आवळे, वय 32 वर्ष, या जखमी झाल्या चालक बालाजी कोंडीबा पोळे,वय 30 वर्षे, रा. वडाचीवाडी ग्रामपंचायत जवळ पुणे याला अटक करण्यात आली दुचाकी चालक महिला नामे कोमल सागर आवळे, रा. आवळेवाडी, वाघोली, पुणे या मुलगी नामे दीदी सागर आवाळे, वय 5 वर्ष व मुलगा शौर्य(मयत),वय 7 वर्ष यांचे सोबत त्यांच्या दुचाकीवरून भिंगारे ऑटो सेल्स अँड सर्विसेस, कात्रज बायपास रोड, उरुळी देवाची गाव, मंतरवाडी कमानीजवळ येथे आले असता, त्यांच्या पाठीमागून येणारा डंपर क्रमांक MH 12 VF 0567 ने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी वरील सर्वजण चालक रस्त्यावर पडल्याने मयत मुलगा शौर्य याच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने तो जागीच मृत पावला तसेच दुचाकी चालक महिला कोमल या जखमी झाल्या. अपघातामुळे मयत मुलाचे नातेवाईक आक्रमक झाल्याने डंपर पेटवून दिला. त्यानंतर फायर ब्रिगेडला बोलून डंपरची विझवली. सदर ठिकाणची वाहतूक नॉर्मल करून घेतली आहे