Pune | गुंतवणूक स्कीम नसताना जादा परताव्याच्या आमिषाने पाऊण कोटींची फसवणूक
By विवेक भुसे | Updated: April 24, 2023 15:08 IST2023-04-24T14:58:52+5:302023-04-24T15:08:13+5:30
पाऊण कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

Pune | गुंतवणूक स्कीम नसताना जादा परताव्याच्या आमिषाने पाऊण कोटींची फसवणूक
पुणे : कंपनीची गुंतवणुकीची कोणतीही स्कीम नसताना ट्रिनिटी कम्युनिकेशन कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांची पाऊण कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अमित कांबळे (वय ४२, रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद विजय पाटोळे, संतोष रुडाल्फ आरलंड, सुष्मिता संतोष आरलंड- मिरजकर यांच्यावर फसवणूकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्था मधील हितसंबधातचे संरक्षण ( एमपीआयडी. ) अंतर्गत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरलंड यांच्या ट्रिनिटी कम्युनिकेशन या कंपनीची कोणतीही गुंतवणुकीची पॉलिसी नाही. असे असताना फिर्यादी यांच्या ओळखीचे आनंद पाटोळे यांनी कंपनीची माहिती सांगून या कंपनी मध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले. संतोष आरलंड व सुष्मिता आरलंड यांनी फिर्यादी यांच्या शी संपर्क साधून गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आश्वासन दिले. त्यानुसार फिर्यादी यांनी २४ लाख रुपयांची गुंतवणुक डिसेंबर २०२१ मध्ये केली. त्यापैकी १६ लाख ९५ हजार रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली. तसेच ४३ लाख, ११ लाख व ४ लाख रुपयांची इतरांची फसवणूक केली असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे तपास करीत आहेत.