भरधाव कारने ७ वाहनांना उडवले, एक महिला ठार तर ५ जखमी; चौफुला येथे भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 23:45 IST2025-10-23T23:44:46+5:302025-10-23T23:45:09+5:30
भरधाव आय-20 गाडीने दोन रिक्षा, चार दुचाकी आणि पिकअप वाहनाला उडवले चौफुला परिसरात खळबळ

भरधाव कारने ७ वाहनांना उडवले, एक महिला ठार तर ५ जखमी; चौफुला येथे भीषण अपघात
वरवंड / केडगाव - दौंड तालुक्यातील चौफुला येथे पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौफुला- वरवंड रोडवर परिसरात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने धावणाऱ्या आय २० कारने दोन रिक्षा, तीन दुचाकी आणि एक पिकअप वाहनाला जबर धडक दिली. या अपघातात एका महिलेला जागीच ठर झाली असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
आय २० कार पुण्याकडून सोलापूरकडे प्रचंड वेगात जात असताना चौफुला चौकाजवळ वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन प्रवासी रिक्षांना जोरदार धडक दिली. त्यानंतर ती कार चार दुचाकींवर आदळली आणि शेवटी पिकअप वाहनावर आदळली. त्यानंतर बस स्टॉप वर उभे असणारे पाच जणांना उडवले त्यातील एक महिला जागीच ठार झाली. इतर जखमी प्रवाशांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजेंद्र भारत अन्नदाते, वय ६२ वर्षे, व्यवसाय मजुरी, सध्या रा. कोरेगाव, कृष्ण कुंज निवास, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ गाव. वाशी, ता. बार्शी, जि. सोलापुर, या अपघाता मध्ये पदमावती भारत अन्नदाते, वय ८४ वर्षे,या अपघातात ठार झाल्या आहेत. बस स्टॉपला बसची वाट पाहत असताना एका आय २० कार चालक याने त्याचे ताब्यातील वाहन वेगाने बेदारकरपणे, वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात चालवत होता. त्याने चारचाकी वाहनाने बस स्टॉप येथे थांबलेल्या लोकांना तसेच तेथे उभ्या असलेल्या मोटार सायकल, रिक्षा, व पिक गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात इतर ५ जणांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. १) प्रसाद मांरेश्वर कुलकर्णी, ग. सावंत गल्ली, करमाळा, ता. करमाळा, जि. मोलापुर, २) सलिम रसूलभाई शेख, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे, ३) बालाजी कोंडीबा पावडे, रा. बोरीपारधी, चौफुला, ता. दौंड, जि. पुणे, ४) प्रतिक व्यंकटेश शिर्के, रा. बोरीपारधी, ता. दौंड, जि. पुणे, ५) व्यंकटेश देवराज शिर्के, रा. बोरीपारधी, ता. दौड या जखमींवर उपचार सुरू आहे. या धडकेचा आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी धावले. अपघात इतका भीषण होता की काही वाहनांचे अक्षरशः तुकडे झाले. ठार झालेली महिला रस्त्याच्या कडेला उभी असताना कारने तिला चिरडले, अशी माहिती मिळाली आहे.