पुण्यात हाय टेन्शनच्या वायरला पाय लागून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 14:52 IST2022-07-12T14:49:28+5:302022-07-12T14:52:28+5:30
सिंहगड रस्त्यावरील घटना...

पुण्यात हाय टेन्शनच्या वायरला पाय लागून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यात एका २० वर्षाचा तरुणाचा हाय टेन्शन वायरला पाय लागल्याने जागीच मृत्यू झाला. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दत्तवाडी या भागात मुलाचा मृत्यू झाला आहे .रोहित थोरात असे मुलाचे नाव. सकाळी दूध आणायला गेला असता रोहितचा पाय रस्त्यावर पडलेल्या हाय टेन्शन वायरला लागला आणि तो जागीच मृत्यू पावला.
सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी अपघातही झाले आहेत. दत्तवाडी परिसरात तरूणाचा रस्त्यावरून जाताना हाय टेन्शनच्या वायरला पाय लागला. त्यात या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
शहरात संततधार पाऊस
पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे. सर्वत्र गार वातावरण झाले आहे. रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्याने दिसून आले आहे. अनेक भागात वाहतूककोंडीला नागरिक सामोरे जात आहेत. रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने अनेक भागात खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी झाडपडीच्या घटनाही झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्याने प्रवास करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.