Pune Crime: पुण्यात व्यावसायिकाची जादूटाेणाच्या बहाण्याने ९० लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: August 30, 2023 18:59 IST2023-08-30T18:58:29+5:302023-08-30T18:59:11+5:30
समर्थ पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी बुधवारी (दि. २९) दिली आहे....

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकाची जादूटाेणाच्या बहाण्याने ९० लाखांची फसवणूक
पुणे : परदेशात व्यवसाय सुरु करण्याचे बहाण्याने पुण्यातील जादूटाेणा करुन तब्बल ९० लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुण्यातील रास्ता पेठ परिसरात चप्पलचे दुकान असलेल्या शेख अब्दुल बासीत अब्दुल लतिफ (वय-४५,रा.काेंढवा,पुणे) यांनी सहा आरोपी विराेधात समर्थ पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी बुधवारी (दि. २९) दिली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार २९ ऑगस्ट २०२० ते १९ ऑगस्ट २०२२ यादरम्यान घडला आहे. नादीर नईमाआवादी, सीमा नईमाआवादी व माैलाना आत्तार यांचा इम्पाेर्ट व्यवसाय नाही हे इतर आरोपींना माहिती होते. तरीदेखील त्यांनी फसवणुकीचे उद्देशाने आपापसात संगनमत करुन कट रचला. तक्रारदार शेख बासीत व त्यांची पत्नी यांचा विश्वास संपादन करुन गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास त्यांना भाग पाडले. संबंधित तीन आरोपींनी खाेटी कागदपत्रे दाखवून साऊदी मक्का येथे माेठा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून विश्वास संपादन केला.
माैलाना शोएब अत्तार याने जादुटाेणा सारखे अघाेरी कृत्य केले त्याकरिता आरोपी नादीर हुसैन अली याने दुजाेरा दिला. तक्रारदार यांना गुंगीकारक पाणी पिण्यास लावून तक्रारदार यांचेकडून तावीज बनविण्याकरिता राेख २५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे देऊनही तावीज न देता तसेच वेळाेवेळी तक्रारदार यांचेकडून त्यांचे इम्पाेर्ट, एक्सपाेर्टचे व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास सांगून तक्रारदाराला गुंतवणुक रक्कम व त्यावरील परतावा असे एकूण चार काेटी रुपये परत न देता त्यांची एकूण ९० लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमाआवादी (वय-४०,रा.कॅम्प,पुणे), सीमा नादीर नईमाआवादी (३५), माैलाना शोएब मैनुद्दीन अत्तार (३५,रा.बाेपाेडी,पुणे), माजीद उस्मान आत्तार (५०), खालीद मैनुद्दीन आत्तार(४०) व इरम शोएब आत्तार (३२,रा.बाेपाेडी,पुणे) अशा सहा आर्थिक फसवणुकीचा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलीस उपनिरीक्षक एस रणदिवे पुढील तपास करत आहेत.