सामान्यांची वाहतूक करणाऱ्या पीएमपीएमएल संकटात; १ हजार कोटींचा तोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 09:38 AM2023-12-27T09:38:19+5:302023-12-27T09:38:38+5:30

मागील वर्षी २०२२-२३ मध्ये ५१० कोटी रुपयांचा महसूल पीएमपीला मिळाला. त्यापेक्षा पीएमपीएमएलचा खर्च हा १ हजार १६३ कोटी इतका होता

In PMPML crisis transporting commons 1 thousand crores loss | सामान्यांची वाहतूक करणाऱ्या पीएमपीएमएल संकटात; १ हजार कोटींचा तोटा

सामान्यांची वाहतूक करणाऱ्या पीएमपीएमएल संकटात; १ हजार कोटींचा तोटा

पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएमएलचा तोटा १ हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचे चाक तोट्याच्या चक्रव्यूहात पुरते अडकले आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये पीएमपीएमएलच्या बस संचलन करत आहेत. खासगी ठेकेदारांच्या बस मोठ्या प्रमाणात सध्या पीएमपीमध्ये आहेत. पीएमपीएमएलचा तोटा वर्षानुवर्षे वाढत चालला आहे. मागील वर्षी २०२२-२३ मध्ये ५१० कोटी रुपयांचा महसूल पीएमपीला मिळाला. त्यापेक्षा पीएमपीएमएलचा खर्च हा १ हजार १६३ कोटी इतका होता. यावर्षी ६०० कोटींपर्यंत महसूल मिळण्याची शक्यता असून, १ हजार कोटींचा तोटा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पीएमपीएमएलला २०२०-२१ आणि २०२१-२२ ही दोन वर्षे कोरोना काळ असल्यामुळे वर्षाला प्रत्येकी ६३९ कोटींचा तोटा झाला होता. पीएमपीएमएलमध्ये ११ हजार कर्मचारी आहेत. त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर इंधनाचे दर वाढले आहेत. पीएमपीएमएल ही ठेकेदारांकडून बस भाड्याने घेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च यावर होत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये अनेक मार्ग सुरू करण्यात आले आहेत.

पीएमपीएमएलचा तोटा वाढत असल्यामुळे याचा भार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर पडत आहे. संचलन तूट भरून देण्याचे दायित्व या महापालिकांवर आहे. आता यामध्ये पीएमआरडीएचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षात पुणे महापालिकेला सुमारे ६०० कोटी रुपये संचलन तूट द्यावी लागेल, असा अंदाज आहे.

पीएमपीएमएलला १ हजार कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता आहे. पीएमपीएमएलला सध्या महिन्याला ५० कोटींचे उत्पन्न मिळते. या प्रमाणात खर्च अधिक आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात येईल. - विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

Web Title: In PMPML crisis transporting commons 1 thousand crores loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.