शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Pune Metro: पुणे मेट्रो सुरु झाल्यापासून अवघ्या ८ दिवसात '२ लाख प्रवासी अन् ३२ लाखांची कमाई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 21:25 IST

मेट्रोचे बुकिंग करणारे मेट्रो अँप आतापर्यंत २७ हजार जणांनी केले डाऊनलोड

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ च्या सुमारास मेट्रो सुरु करण्यात आली होती. पुणेकरांनी अतिशय उत्साहात मेट्रोने प्रवास केल्याचे दिसून येत होते. पहिल्याच दिवशी फक्त ५ तासात तब्बल २२ हजार पुणेकरांनी प्रवास केला होता. त्यावेळी ४ लाख ६६ हजार ४६० एवढी पुणे मेट्रोची कमाई झाली होती. त्यानंतर दररोज असंख्य पुणेकर मेट्रोने प्रवास करू लागले. पुण्यात मेट्रो नवीन असल्याने नागरिकांचा उत्साह वाढतच चालला होता. सहा मार्च पासून अवघ्या ८ दिवसात मेट्रोला २ लाख २७ हजार ९५० प्रवासी मिळाले. त्यांच्याकडून मेट्रोला ३२ लाख ४५ हजार ६७३ रूपयांचे उत्पन्न मिळाले. 

२०१४ साली पुणे मेट्रोला मंजुरी मिळाली होती. तर २०१६ साली मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आता तब्बल ८ वर्षांनी पुणेकरांना मेट्रोचा सुखद प्रवासाचा अनुभव मिळाला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असंख्य नागरिक मेट्रोने प्रवास करण्यासाठी अजूनही येत आहेत. प्रत्येक ठिकाणी फोटो सेशन सुरु असल्याचेही पाहायला मिळत आहे. 

रविवारी एका दिवसात १० लाखांचे उत्पन्न 

रविवारी सुटीच्या दिवशी ( दि. १३) मेट्रोमधून  ६७३५० नागरिकांनी प्रवास केला. त्यातून मेट्रोला एकाच दिवशी १०,०७,९४० रुपये उत्पन्न मिळाले. मेट्रोला नागरिकांचा पुणे व पिंपरी - चिंचवड अशा दोन्ही शहरांमध्ये वाढता प्रतिसाद आहे. पुण्यात वनाज ते गरवारे व पिंपरी चिंचवड मध्ये पिंपरी ते फुगेवाडी या मार्गांवर शालेय मुलांपासून ते व्रुद्ध व्यक्ती तसेच समाजाच्या सर्व स्तरातील नागरिक मेट्रो सफारीचा आनंद लुटत आहेत. मेट्रोचे पुढील मार्ग काम पूर्ण होऊन त्वरीत सुरू व्हावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

मेट्रोचे बुकिंग करणारे मेट्रो अँप आतापर्यंत २७ हजार जणांनी केले डाऊनलोड मोबाईलमध्ये असणाऱ्या प्ले स्टोर मधून (pune metro app) उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते अँप वापरण्यासाठी अँपमध्ये स्वतःची माहिती भरणे बंधनकारक आहे. त्यातच तुम्हाला एक पासवर्ड तयार करावा लागणार आहे. म्हणजे नेहमी अँप उघडताना तो पासवर्ड टाकावा लागेल. अँपमध्ये सध्या सुरु असलेल्या स्टेशनची नावेही देण्यात आली आहेत. नागरिकांना सिंगल आणि रिटर्नचे तिकीटही काढता येणार आहे. मेट्रोच्या तिकिटाप्रमाणेच प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मोबाईलमध्ये डाउनलोड केलेल्या तिकिटाचा कोड स्कॅन करावा लागणार आहे. हे मेट्रोचे बुकिंग करणारे मेट्रो अँप आतापर्यंत २७ हजार जणांनी केले डाऊनलोड मेट्रो पटशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Metroमेट्रोpassengerप्रवासीticketतिकिटMONEYपैसाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका