शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बारामतीत लसणाला उच्चांकी २८० रुपये प्रतिकिलो 'भाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 19:22 IST

बारामती : बारामती बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची ...

बारामती : बारामतीबाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये लसणाला उच्चांकी २८० रुपये प्रतिकिलोस असा भाव मिळावा तर लसणाला सरासरी २२० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.त्याच बरोबर शेवग्याचे भाव ही तेजीत असून शेवग्याला प्रतिकिलो कमाल २५० रूपये व सरासरी २०० रुपये असा उच्चांकी दर मिळत आहे तसेच गवार, वांगी, मिरची, भेंडी, वाटाणा, दोडका, गाजर, दुधी भोपळा, कारले व इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांना चांगले दर मिळत आहेत. थंडीचा कडाका वाढल्याने बाजारात आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.बारामती बाजार समितीने जळोची भाजी मार्केट आवारात शेतकरी व व्यापाऱ्यांना विविध सुविधांबरोबरच सेलहॉलची उभारणी केलेली आहे. त्यामुळे शेतामालाचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होत आहे तसेच शेतमालाला कटती नाही, कुठलीही सूट नाही. त्यामुळे बारामतीसह आसपासच्या तालुक्यातुन फळे व भाजीपाल्याची आवक होत आहे. आवारात फळे व भाजीपाला उघड लिलावाने खरेदी विक्रीची सोय असल्याने बाहेरील खरेदीदार येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार आवारातच विक्री करावा, असे आवाहन बारामती बाजार समितीतर्फे करण्यात येत आहे.किरकोळ बाजारात लसणाला प्रतिकिलो ४०० रुपये दरमागील वर्षी १०० रुपयांमध्ये चार किलो लसूण घरपोहोच मिळत होता. लसणाचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने लागवडीचे प्रमाण घटले. आवक कमी आणि मागणी वाढल्याने यंदा लसणाचे दर वाढले आहेत. बाजारात लसणाचे दर कडाडले आहेत. किरकोळ दरात सध्या बाजारात लसणाला प्रति किलो ४०० दर मिळाला आहे,अशी माहिती श्री गणेश भाजी मंडई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चिऊशेठ जंजिरे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रvegetableभाज्याMarketबाजारBaramatiबारामती