शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भीतीच्या वातावरणात मणिपूर हिंसाचाराने होरपळून निघाले; बारामतीच्या विद्यार्थिनीचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 12:02 IST

आम्ही तणाव अन् भीतीच्या वातावरणात मिळेल तेवढा भात व भाजी खाऊन कसेबसे दिवस काढले

प्रशांत ननवरे

बारामती : सुमारे चार ते पाच दिवस कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. येथे परिस्थिती चिघळलेली होती, अशा वातावरणात मिळेल तेवढा भात व भाजी खाऊन आम्ही कसेबसे दिवस काढले. आमच्या होस्टेलच्या गेटच्या समोर ग्रेनाइट फुटून मोठी आग लागताना आम्हाला दिसत होती. प्रत्यक्षात नाही पण तेथील गंभीर प्रसंगाचे वायरल झालेले व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप होत असे. तब्बल पाच दिवस कर्फ्यू लावण्यात आला होता. इंटरनेट सह इतर सुविधा बंद होत्या, अशा शब्दात बारामतीच्या अश्वगंधा पारडे  या विद्यार्थिनीने मणिपुरच्या परीस्थितीचा अंगावर शहारे आणणारा अनुभव ‘लोकमत’शी बोलताना कथन केला.

अधिक माहिती देताना अश्वगंधा या विद्यार्थीनीने सांगितले,  मी पुण्यातील गरवारे कॉलेजची माजी विद्याथीर्नी आहे. सध्या नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, इंफाळ येथे दोन वर्षांपासून मास्टर्स स्पोर्ट्स सायकललॉजीचे गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण घेत आहे. माझे शिक्षण पूर्ण होत आले असून केवळ परीक्षा देणे बाकी आहे. परंतु, ३ मे रोजी सायंकाळी चार-पाच वाजता मणिपूर हिंसाचाराने होरपळून निघाले. मणिपूर मध्ये सर्वत्र तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक स्थानिक नागरिकांना निर्माण झालेल्या वातावरणामुळे मणिपूर सोडून आसाम राज्यात आश्रयासाठी जावे लागले. गेल्या  गेल्या दोन वर्षात तीन वेळा असे प्रसंग आले होते. त्यावेळी एक दोन दिवसांत वातावरणातील तणाव शांत होत असे. परिस्थिती पूर्ववत होत असे. यंदा चौथ्या वेळी प्रथमच परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली. आमच्या होस्टेलच्या गेटच्या समोर ग्रेनाइड फुटून मोठी आग लागताना आम्हाला दिसत होती. प्रत्यक्षात नाही पण तेथील गंभीर प्रसंगाचे वायरल झालेले व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप होत असे.परंतु लष्कर आणि एनएसजीचे कमांडर आल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात निवळली.                      कॉलेज आम्हाला घरी सोडायला तयार नव्हते. जबाबदार देखील घ्यायला तयार नव्हते. होस्टेलमधून बाहेर पडण्यास परवानगी देखील नव्हती. यामध्ये मणिपुरी विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. तसेच मेसमध्ये काम करणाºया तेथील स्थानिक कामगारांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आमचे जेवणाचे हाल होऊ लागले. भात आणि भाजी असेल तर देण्यात येत. नाष्ट्यामध्ये ब्रेड आणि उकडलेले अंडे मिळत असे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाण्यास सुरूवात झाल्याचे दिसताच मी माझ्या पप्पांना संपर्क साधला. माझ्या प्रमाणेच इतर विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या पालकांना संपर्क साधला. शेवटी महाराष्ट्र शासनाने आम्हाला स्वतंत्र विमानाद्वारे महाराष्ट्रात आणले. त्यासाठी इम्फाळमधून मणीपूर स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये आम्हां २५ विद्यार्थ्यांना पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. तेथुन विमानाने गुवाहाटीला आणण्यात आले.

पप्पांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांचे  बोलणे झाले असून काळजी करू नका, असा दिलासा दिला. आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोग्य आणि जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही घरी या अशी महत्त्वाची भूमिका घेतली. महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून आम्हाला सुरक्षितरीत्या आणले. आम्हाला विमानाने गुहाटी मार्गे मुंबईपर्यंत आणले. मी मंगळवारी (दि ९) पुण्यात सुखरूप पोहोचले.माझे वडील डॉक्टर असून सरकारी सेवेत आहेत. आई गृहिणी आहे. मला परत घरी आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला.आम्हाला राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचे आभार मानते,असेही अश्वगंधा पारडे हिने सांगितले. 

...या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही

माझ्या दोन विषयांची परीक्षा २१ जुन रोजी आहे.तेवढ्या दोन विषयांच्या परीक्षेसाठी जावे लागणार आहे.कॉलेज आॅनलाईन परीक्षा घेण्यास तयार नाहि.परीस्थिती न निवळल्यास परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.त्यानंतर काय होणार,या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाहि,अशी व्यथा अश्वगंधा पारडे या विद्यार्थीनीने सांगितली.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीWomenमहिलाStudentविद्यार्थीEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र