शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

पुण्याचा पाणीवापर नियंत्रित करणे अशक्य : पाटबंधारे मंडळाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 13:24 IST

खडकवासला प्रकल्प साखळीतील चारही धरणांतून ३३.७७ टीएमसी पाणीवापरासाठी मंजूर

ठळक मुद्देसमन्यायी पाणीवाटपाच्या आदेशाचे पालन करण्याचे आव्हानपाटबंधारे मंडळाचे स्पष्टीकरण जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आदेश देऊनही पाणी उपसा यंत्रणा उगम ते अंतिम ठिकाण यानुसार मंजूर कोटा देण्याचा आदेश

पुणे : जनाई-शिरसाई योजनेअंतर्गत बारामती, पुरंदर व दौंड या तालुक्यांना उपलब्ध पाण्यातून समन्यायी पद्धतीने पाणी देण्याचा आदेश जलसंपदा विभागाचे प्राथमिक विवाद निवारण अधिकारी वि. गि. रजपूत यांनी दिला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आदेश देऊनही पाणी उपसा यंत्रणा महापालिकेने जलसंपदा विभागाच्या ताब्यात दिली नाही. महापालिकेच्या जवळपास पावणेएकोणीस टीएमसी पाणीवापरावर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याची बाजू पुणे पाटबंधारे मंडळाने मांडली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आव्हान मंडळासमोर आहे. जनाई-शिरसाई योजनेला समन्यायी पद्धतीने पाणी मिळावे, यासाठी बारामतीतील शेतकरी विठ्ठल जराड यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तथा प्राथमिक विवाद निवारण अधिकाºयांकडे दावा दाखल केला होता. जनाई-शिरसाई योजनेसाठी मंजूर असलेले ३.६० टीएमसी पाणी हंगामनिहाय मिळावे,  शिर्सुफळ तलावात ‘उगम ते अंतिम ठिकाण’ या तत्त्वानुसार पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यात दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर प्राथमिक विवाद निवारण अधिकाºयांनी शेतकºयांचे म्हणणे ग्राह्य धरत पाणी सोडण्याची मागणी केली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रकल्पीय तरतुदी व पाणी उपलब्धतेनुसार पाणी कोटा मंजूर करून त्यानुसार पाणीवाटप करण्यात यावे. तसेच, उगम ते अंतिम ठिकाण यानुसार मंजूर कोटा देण्याचा आदेश दिला आहे.खडकवासला प्रकल्प साखळीतील चारही धरणांतून ३३.७७ टीएमसी (प्रकल्पीय साठा) पाणीवापरासाठी मंजूर आहे. खडकवासला धरणातून पुणे शहराला पिण्याच्या पाण्यासाठी ११.५० टीएमसी पाणी मंजूर आहे. आकस्मिक पाणी निश्चिती समितीच्या बैठका १५ ऑक्टोबर पूर्वी होत नसल्याने आणि आरक्षण निश्चितीकरण होत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा वापर बिगर सिंचनासाठी करावा लागतो.शहराला साडेअकरा टीएमसी मंजूर पाणी असूनही महापालिकेने २०१७-१८मधे १८.७१ टीएमसी पाणीवापर केला. पाणीउपसा ठिकाणे आणि त्याची साधनसामग्री महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानंतरही महापालिकेने जलसंपदा विभागाकडे दिलेली नाहीत. त्यामुळे महापालिकेचा पाणीवापर नियंत्रित करणे शक्य होत नसल्याची भूमिका पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी मांडली आहे. .....अपूर्ण बांधकामामुळे अडचणीजनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतील कालव्याची जागा अनेक ठिकाणी मुरमाड आहे, तसेच काही ठिकाणी खोल खोदाईतून (डीप कट) पाणी जाते. त्यामुळे पाणी पुढे सरकण्यात अडचण येते. ही योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. अनेक ठिकाणचे काम अपूर्ण असल्याने सिंचनाची अंमलबजावणी करता येत नसल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. .........ही माहिती देण्याचे पाटबंधारे मंडळाला आदेशखडकवासल्यापासून अंतिम टोकापर्यंत हंगामनिहाय होणारा पाणी वापर आणि गळतीची आकडेवारी द्यावीवरवंड व शिर्सुफळ तलावातील पाण्याचा ग्राहकनिहाय (शेतकरी, बिगरसिंचन व पिण्याचे पाणी) हिशेब द्यावा. ६५ तलाव भरून देण्याबाबत जनाई-शिरसाई योजनेची माहिती सादर करा.कुरकुंभ पाणी आरक्षण आणि जनाई-शिरसाईतील अडचणींची माहिती द्यावी.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDamधरण