महत्त्वाची बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 09:57 IST2022-08-26T09:55:55+5:302022-08-26T09:57:15+5:30
या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा...

महत्त्वाची बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक
पुणे :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ (मुंबई दिशेने) ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम एमएसआरडीसीतर्फे आज, शुक्रवारी (दि. २६ ऑगस्ट) करण्यात येणार आहे. या कारणास्तव दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक किवळे ते देहु रोड मार्गे सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव टोल नाकामार्गे मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.
या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.