शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सासूच्या प्रियकरासोबत सुनेचे अनैतिक संबंध; काटा काढत रचला सुनेच्या आत्महत्येचा बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 19:54 IST

मौजे निमगाव केतकी येथील घटना चार आरोपींना अटक

बाभुळगाव : निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथे सासुच्या प्रियकरासोबत सुनेचे अनैतिक संबध असल्याच्या संशयातुन २१ वर्षीय विवाहीतेचा सासरच्यांनी दोरीने गळफास देवुन खुन केल्याची घटना घडली आहे.खुन करून मृृतदेह ओढणीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला अडकवला. व गळफास घेवुन आत्महत्या केल्याचा खोटा बनाव रचला. ही घटना शनिवारी सायंकाळी राहत्या घरात ही घटना घडली आहे. 

याप्रकरणी मयत विवाहितेची आई सावित्री उर्फ आक्काबाई हरी नाळे (वय ४८ रा.निमगाव केतकी, ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंदापूर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

राणी किरण भोंग (वय २१, रा.इरिगेशन बंगला,निमगाव केतकी,ता.इंदापूर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सासू शोभा बाळु भोंग (सासू), सासरा बाळु नामदेव भोंग, दिर सुनिल बाळु भोंग व पती किरण बाळु भोंग (सर्व रा.इरिगेशन बंगला, निमगाव केतकी, ता.इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

फिर्यादीत म्हटले आहे की, मयत विवाहितेची सासु शोभा भोंग हिचे हुलगे नावाच्या इसमाबरोबर अनैतिक संबध होते.तर सुनेचेही वरील हुलगे नावाच्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय तिची सासु, सासरा, पती व दीर यांना आला होता. याच संशयावरून वरील सर्वांनी संगनमत करून जाणीवपूर्वक विवाहितेचा दोरीने गळा आवळुन खून केला.त्यानंतर मयत विवाहितेच्या गळ्यात ओढणी बांधुन मृृृृतदेह घरातील खोलीच्या लोखंडी अँगलला अडकवला व आतुन दरवाजा बंद करून खिडकीतुन बाहेर येत विवाहितेने गळफास घेतल्याचा बनाव केला.

त्यानंतर रविवारी ( दि.२१) अंत्यविधीवेळी मृृृृत राणीची सासु शोभा भोंग हिने फिर्यादी यांना धमकी देत राणीला संपवले आहे.पोलिसात तक्रार केल्यास तुझ्या दोन मुलांनाही संपवून टाकीन अशी धमकी दिली व फिर्यादीच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

मृृृृत राणीच्या वैद्यकीय तपासणीमध्ये दोरीने गळा आवळल्याचे स्पष्ट झाले असून इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, इंदापूर प्रभारी पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धोतरे हे करत आहेत.————————————————————————

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला